Nashik Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News: जन्मदात्या आईनेच चिरला ३ महिन्यांच्या चिमुकलीचा गळा; नाशकातील क्रूर घटनेचा २४ तासांत छडा

Nashik Crime News : नाशिक शहरातून एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली.

Satish Daud

तबरेज शेख, साम टीव्ही

Nashik Crime News : नाशिक शहरातून एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली. नाशिकच्या धृवनगर परिसरात सोमवारी ३ महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी २४ तासांच्या आत तपासाची चक्रे फिरवत घटनेचा उलगडा केला आहे. आईनेच आपल्या ३ महिन्याच्या पोटच्या मुलीची हत्या केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. (Latest Marathi News)

याप्रकरणी पोलिसांनी मृत मुलीच्या आईला ताब्यात घेतलं आहे. धृवांशी भूषण रोकडे वय ३ महिने, असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. आईनेच आपल्या पोटच्या मुलीचा गळा चिरल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर  (Nashik News)  सातपूर लिंक रोड येथील धृव नगर परिसरात भूषण रोकडे हे आपली पत्नी, आई आणि ३ महिन्याची चिमुकली धृवांशी यांच्यासमवेत राहतात. भूषण हे सातपूर येथील एका कंपनीत सुपरवायझर आहेत. सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामाला गेले. तेव्हा घरात त्यांच्या आई आणि पत्नी दोघीच होत्या.

सायंकाळी त्यांची आई दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी भूषण यांची पत्नी आणि चिमुकली धृवांशी घरात होत्या. या गोष्टीचा फायदा घेत एक पंजाबी ड्रेस घातलेली अज्ञात महिला अचानक घरात घुसली आणि तिने आपल्याला बेशुद्ध करून चिमुकलीचा गळा चिरल्याची  (Crime News) फिर्याद मृत धृवांशीच्या आईने पोलिसांत दिली होती.

दरम्यान, आईच्या जबाबानंतर पोलिसांनी (Police) परिसरातील सर्व सीसीटिव्ही तपासणी केली. शेजारील नागरिकांचे जबाब घेतले. मात्र अशा वर्णनाची बाईला कुणी पाहिले नसल्याचे सांगण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांना घटनेची वेळ आणि संशयित युक्ता हिने दिलेल्या जबाबात तफावत आढळून अाल्याने संशय बळावला.

अखेर सलग १० तासांच्या चौकशी नंतर संशयित युक्ताने मुलीचा खून केल्याची कुबली दिली. पती आणि सासू मुलीलाच जीव लावत असल्याने आपण तिची हत्या केल्याची कबुली आईने दिली. संशयित आईने किरकोळ कारणासाठी पोटच्या मुलीचा गळा चिरल्याने पोलिस अधिकाऱ्यांना धक्का बसला. महिलेची चौकशी करत असतांना अतिशय कौशल्यपुर्ण आणि भावनिकतेने पोलिस अधिकाऱ्यांना या गुन्ह्याचा छडा लावला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : राजीव गांधींची हत्या झाली तशीच अजित पवारांची झाली का? राष्ट्रवादीच्या आमदाराचे ८ सवाल

Maharashtra Live News Update: मातंग समाज पुन्हा आक्रमक,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद

Success Story: आधी CA, मग IPS, नंतर IAS अधिकारी; माधव अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

T20 World Cup 2026: 'या' चुकीमुळे टीम इंडियाच्या हातातून निसटला सामना; पराभवानंतर सूर्यादादा संतापला

Misal Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी झणझणीत मिसळ कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT