Nashik Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Crime News : दारू पिण्यावरून पती-पत्नीमध्ये पेटला वाद; संतापलेल्या नवऱ्याकडून बायकोची हत्या

Crime News : महिलेचा पती कायम दारूच्या नशेत असायचा. पती सतत दारू पित असल्याने पत्नीचे आणि त्याचे नेहमी भांडण व्हायचे. काल देखील या दोघांमध्ये अशीच जोरदार भांडणे झाली.

Ruchika Jadhav

Nashik News :

नाशिकमध्ये पतीसोबत झालेल्या भांडणात पत्नीला मारहाण झाली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेबाबत पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. विवाहीत महिलेच्या हत्येने सध्या परिसरात खळबळजनक वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या अधिक महितीनुसार, नाशिकच्या तामसवाडी निफाड येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. एक विवाहीत जोडपं येथे राहत होतं. महिलेचा पती कायम दारूच्या नशेत असायचा. पती सतत दारू पित असल्याने पत्नीचे आणि त्याचे नेहमी भांडण व्हायचे. काल देखील या दोघांमध्ये अशीच जोरदार भांडणे झाली.

ही भांडणे इतकी विकोपाला गेली की, पतीने आपल्याच पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचं डोकं भिंतीवर आपटलं गेलं. यावेळी तिचा भाऊ देखील घरात होता. बहिणीला होणारा त्रास त्याला बघवला नाही. त्याने दोघांमध्ये पडून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने पत्नीच्या भावाला देखील मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

पत्नीचं डोकं भिंतीव आदळल्यानंतर पत्नीच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. रागात आपल्याकडून मोठी चूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने पत्नीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी महिलेला तपासून मृत घोषित केलं. माझी पत्नी पाय घसरून पडली आहे, असं पतीने डॉक्टरांना सांगितलं होतं.मात्र ही हत्या असल्याचं डॉक्टरांच्या लगेचच लक्षात आलं.

डॉक्टर आणि जिल्हा रुग्णलाय पोलीस चौकीवर असलेले पोलिस कॉन्स्टेबल शरद पवार यांना संशय आल्याने त्यांनी पतीची चौकशी केली. त्यावेळी पतीने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीचा खून मीच केला असल्याची पतीने पोलिसांना कबुली दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गॅस तुटवड्यावरून लोकसभेत वातावरण तापलं; देशात CNG, LPG गॅसची स्थिती काय? केंद्रीय मंत्री हरदीप पुरींनी सगळं सांगितलं

Maharashtra Live News Update: पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेचा यलो (Heat Wave) अलर्ट

Crime: घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीचं कारमधून अपरहण, गुंगीचे औषध देऊन बलात्कार

लग्न समारंभातून परतत असताना भल्या पहाटे वऱ्हाडी लोकांवर काळाचा घाला; चालकाची एक चूक अन्... अपघाताची थरारक घटना

Shocking : सासूने सुनेला बॉयफ्रेंडसोबत बेडवर नको त्या अवस्थेत पाहिलं; नंतर भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT