Nashik Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime: हटकल्याचा राग डोक्यात गेला, गावगुंडांकडून पोलिस उपनिरिक्षकावर जीवघेणा हल्ला

Attack On Assistant Sub Inspector: नाशिकमध्ये ड्युटीवरून घरी जात असताना पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत.

Priya More

अभिजीत सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या पंचवटी येथे ही घटना घडली. ड्युटीवरून घरी जात असताना पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात गुंडगिरीने कळस गाठला आहे. पंचवटीमध्ये पोलीस उपनिरीक्षकांना मारहाण करण्यात आली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले प्रकाश नेमाने या पोलिस उपनिरीक्षकांवर सोमवार रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. प्रकाश नेमाने कर्तव्यावरून घरी जात असताना ही घटना घडली.

पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने कामावरून घरी जात असातना त्यांनी काही गावगुंडांना हटकवले. त्यामुळे या गावगुंडांना त्ंयाचा राग आला. त्यामुळे त्यांनी थेट नेमाने यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. गवागुंडांनी दगडाने त्यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये प्रकाश नेमाने हे गंभीर जखमी झाले आहेत. नेमाने यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निवडणुकीच्या काळात थेट पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला झालल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारीची चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ६८ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्याच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या

Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने केलं सई ताम्हणकरचं कौतुक

Shocking : रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेला, सासऱ्यांनी नकार दिला; रागात जावयाने सासरवाडी पेटवली

सिंधुदुर्गातील समुद्रात मोठी दुर्घटना; वादळाच्या तडाख्यात नौका बुडाली

Young adults lifestyle: शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या तरूणांना या आजाराचा धोका; संशोधनातून धक्कादायक बाब समोर

SCROLL FOR NEXT