Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : बाजारात गेलेल्या महिलेची सोनसाखळी लांबविली; मुद्देमालासह चोरटा ताब्यात

Nashik News : सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने या गुन्ह्याची उकल केली. मुद्देमालासह २४ वर्षीय संशयित आरोपी मुकेश भालेराव याला अटक केली

Rajesh Sonwane

तबरेज शेख

नाशिक : गर्दीचा फायदा घेत एकाने बाजारात गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनसाखळी लांबविणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे. (Live Marathi News)

नाशिकच्या ऐन वर्दळीचे  ठिकाण म्हणून ओळख असलेल्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोराने ओरबडली होती. हि घटना सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली होती. सोनसाखळी घेऊन चोरट्याने पायी धूम ठोकली होती. याच घटनेची माहिती भद्रकाली पोलीस ठाण्यात संबंधित महिलेने दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने याबाबत तपास सुरू केला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने या गुन्ह्याची उकल केली. मुद्देमालासह २४ वर्षीय संशयित आरोपी मुकेश भालेराव याला अटक केली. मुकेश हा मूळचा पाचोरा येथील असून कामानिमित्त तो नाशिकच्या टाकळी परिसरात राहत होता. अनेकदा सोनसाखळी चोर दुचाकीचा वापर करून पोबारा करतात. मात्र ऐन गर्दीतून पायी धूम ठोकणारा मुकेश पोलिसांच्या हाती लागल्यानं कामगिरी करणाऱ्या पोलिसांचं कौतुक केलं जातं आहे. लवकरच फिर्यादी महिलेशी संपर्क करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोन्याची पोथ दिली जाईल, असेही पोलिसांकडून माहिती देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT