Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : मित्रांनीच झोपेत असलेल्या मित्राला संपविले; नाशिकमधील घटनेचा उलगडा

Nashik News : नाशिकच्या गंजमाळ परिसरात तीन दिवसांपूर्वी तरुणाची हत्या झाली होती. घरामध्ये झोपलेल्या १८ वर्षांच्या पांडू शिंगाडे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: घरात झोपलेल्या तरुणाची हत्या झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली होती. या घटनेचा धक्कादायक उलगडा झाला असून बदलाच्या भावनेतून मित्रांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

नाशिकच्या (Nashik) गंजमाळ परिसरात तीन दिवसांपूर्वी तरुणाची हत्या झाली होती. घरामध्ये झोपलेल्या १८ वर्षांच्या पांडू शिंगाडे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पांडू आपल्या मोठ्या भावासोबत घरामध्ये झोपला असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पांडूचा जागीच मृत्यू झाला होता. हत्येनंतर आरोपी फरार झाले होते. यामुळे (Crime News) हत्या कोणी व कोणत्या कारणातून केली याचे कारण गुलदस्त्यात होते. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु होता.

संशयितांनी दिली कबुली

दरम्यान हत्या प्रकरणी ३ संशयित आरोपी भद्रकाली पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले. विशेष बाब म्हणजे हत्या करणारे पांडुरंग याचेच मित्र निघाले आहे. हत्येनंतर तिघेही फरार झाले होते. पोलिसांनी गुप्त बतमीदारामार्फत या तिघांना सातपूर परिसरातून फिल्मी स्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांनी तपास केला असता मयत पांडुरंग आणि आरोपीसोबत फिरायचे. मात्र पांडुरंग वारंवार या तिघांना मारायचा म्हणून या तिघांनी पांडुरंगचा बदल घेण्याच्या उद्देशातून मारल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात भाजपची मोठी रणनीती; युवकांना जोडण्यासाठी आखला मास्टरप्लान

शेतकरी कर्जमाफी परदेशी समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर; काय असणार कर्जमाफीचे नियम आणि अटी?

युद्ध पुन्हा पेटणार? ट्रम्पची शरणागती अमान्य; इराणनं शस्त्रसंधी फेटाळून लावली

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला, पत्नीला विषारी औषध पाजल्याचा आरोप | Buldhana crime

SCROLL FOR NEXT