Nashik Crime News  Saam tv
महाराष्ट्र

Video : नाशिकमध्ये चाललंय काय? भर वस्तीत टोळक्याकडून गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद

नाशिकमध्ये जुन्या वादाच्या कुरापतीवरून थेट एक जणावर हल्ला करत त्याच्या घरावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

Nashik Crime News : नाशिकमध्ये जुन्या वादाच्या कुरापतीवरून थेट एक जणावर हल्ला करत त्याच्या घरावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या फुलेनगर भागात ही घटना घडली आहे. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या गोळीबारात एक महिला जखमी झाली आहे. (Latest Marathi News)

मागच्याच आठवड्यात निमानी भागात भर रस्त्यात एकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा नाशिकच्या फुलेनगर परिसरात जुन्या वादातून हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत टोळक्यांनी थेट एका घरात घुसून महिलेवर व तिच्या मुलावर कोयत्याने हल्ला करत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.

या गोळीबारमध्ये महिलेच्या अंगाला गोळी चाटून गेल्याने, त्या जखमी झाल्या आहेत. उषा महाले असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ही संपूर्ण गोळीबाराची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या (Nashik) फुले नगर परिसरात शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दयानंद महाले यांचा मुलगा हा चौकात बसलेला होता. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कुरपतीवरून येथे ७-८ जणांच्या टोळक्याने त्यावर कोयत्याने हल्ला चढवला.

त्याने हा वार चुकवून घराकडे पळ काढला, एवढ्यावर न थांबता हल्लेखोरांनी थेट महाले यांच्या घरावर हल्ला करत गोळीबार केला. तर जाब विचारण्यासाठी आलेल्या उषा महाले यांच्या दिशेने देखील हल्लेखोरांनी गोळीबार (Firing) केला. या गोळीबारात सुदैवाने उषा महाले यांच्या छाती जवळून ही गोळी चाटून गेल्याने त्या थोडक्यात बचावल्या. त्याचबरोबर कुत्र्यांवर देखील हल्लेखोरांकडून गोळी झाडण्यात आली.

हल्लेखोरांनी चार राउंड गोळीबार केल्यानंतर घटनास्थळाहून हल्लेखोर पसार झाले असल्याची माहिती घटनेतील जखमी व त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यातच जर मागच्या काही दिवसांतील घटना पहिल्या तर नाशिकमध्ये क्षुल्लक करणाहून जुन्या वादातून थेट जीवघेणे हल्ले केले जात आहेत.

मागच्याच आठवड्यात दिवसा ढवळ्या भर रस्त्यात निमानी भागात एकाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. निमानीची ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा फुलेनगर भागात ही गोळीबारची घटना समोर आली आहे. यामुळे नाशिककर नागरिक भीतीच्या सावटाखाली असून धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकची ओळख ही कुठेतरी गुन्हेगारी शहर म्हणून होत चालली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराजांचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वत:वरच केले वार

Cabbage Thalipeeth Recipe: सकाळी नाश्त्याला बनवा गरमागरम कोबीचे खुसखुशीत थालीपीठ, सोपी आहे रेसिपी

Rain Alert : महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार, ९ जिल्ह्यांना अलर्ट, वाचा पाऊस कुठे धो धो कोसळणार?

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ₹३०००; या दिवशी जमा होणार पैसे

Maharashtra Live News Update : रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आज निवड

SCROLL FOR NEXT