Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik: गंजमाळ परिसरात दोन गटात तुफान राडा; एकमेकांवर दगडफेक

भद्रकाली पोलिसांनी दोन्ही गटातले लोकांवर गुन्हे दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक - गंजमाळ परिसरात दोन गटात तुफान राडा झाला. एकमेकांवर दगडफेक केल्याने काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दगडफेकीची घटना आणि रस्त्यावर जमलेल्या गर्दीने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होते .या ठिकाणी उभे असलेल्या वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. भद्रकाली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी (Police) परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर पोलिसांच्या तासाभराच्या प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

हे देखील पाहा -

दरम्यान दोन्ही गटातील नागरिकांनी परस्पर विरोधी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे काही वेळ पोलीस ठाण्यात देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीचे दगडफेकीत रूपांतर झाले. त्यामुळे गंजामाळ सह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यापूर्वी परिसरात अशा प्रकारचा वाद झाला आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांना आळा बसावा. यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असताना त्यांच्यासमोर संशयीतांकडून मोठ्या प्रमाणावर वाद घालत एकमेकांवर दगडफेक केली जात होती.

यात वरिष्ठ अधिकारी बाल बाल बचावले.भद्रकाली पोलिसांनी दोन्ही गटातल्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तर गंजमाळ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT