Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: सोशल मीडियावरील पोस्‍टवर स्‍माईलीने वाद; दोघातील भांडणाने गेला तिसऱ्याचा जीव

फेसबुकवरील पोस्‍टवरील स्‍माईलीने वाद; दोघातील भांडणाने गेला तिसऱ्याचा जीव

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : सोशल मिडीयावरील पोस्‍टवरून वाद होत असतात. असा प्रकार नाशिक (Nashik) येथे झाला असून सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टवरून झालेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या इसमाचा खून (Crime News) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Live Marathi News)

सातपूर परिसरातील गोरक्षनाथ रोड काश्मीरे मळा याठिकाणी हा खुनाचा प्रकार समोर आला आहे. लखन नामक इसमाने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्यांनतर संशयीत आरोपी मुन्ना निषाद आणि नरसिंग निषाद या दोघा भावांनी स्मायली टाकल्याने फिर्यादी आणि निषाद भावांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले.

लोखंडी रॉड मारला डोक्‍यात

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या संतोष जैस्वाल गेला. मात्र त्‍यालाच संशयित आरोपी मुन्ना निषाद आणि नरसिंग निषाद यांनी लोखंडी रॉड डोक्यात मारला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या संतोष जैस्वाल याचा या घटनेत मृत्यू झाला. सातपूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या खुनाच्या घटनेतील एका संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आणखी एका संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT