Nashik Ganesh Temple Saam tv
महाराष्ट्र

Nashik Ganesh Temple: मंदिरातील दानपेटी फोडली; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

Nashik News : चोरट्याने मध्यरात्री मंदिराच्या आवारात घुसून लोखंडी कंपाउंडचे कुलूप तोडले. यानंतर मंदिरात प्रवेश केला आणि मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरून नेली

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून मंदिरात ठेवलेली दानपेटी फोडली. यात असलेली रक्कम लांबविली असून (Theft) चोरी करतानाचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजद्वारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणेश मंदिरात ही चोरीची घटना घडली आहे. ठेंगोड येथील सिद्धिविनायक मंदिर हे प्रसिद्ध असून राज्यातील भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. चोरट्याने मध्यरात्री मंदिराच्या आवारात घुसून लोखंडी कंपाउंडचे कुलूप तोडले. यानंतर मंदिरात प्रवेश केला आणि मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरून नेली आहे.. 

चोरटा सीसीटीव्हीत कैद 

चोरीच्या घटनेने गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असून चोराला तत्काळ अटक करावी; अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चोरीची संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली असून या चोरट्याचा शोध पोलीस घेत आहे आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन; गणपतीसमोर साकारला कृषीचा खास देखावा

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

SCROLL FOR NEXT