Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : दुचाकी चोरी करणारे दोन संशयित ताब्यात; साडे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News : दोन हवालदार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना मेरी शासकीय ऑफिस गेटसमोर दोन व्यक्ती संशयितरित्या विना नंबर मोटरसायकल घेऊन फिरताना आढळले

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पंचवटी पोलिसांनी (Nashik) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून ११ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचवटी पोलिसांनी (Police) हस्तगत केला. त्यांनी ९ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. (Breaking Marathi News)

पंचवटी पोलिसांनी यश मांडवडे (रा. चवगाव, ता. बागलाण) आणि प्रशांत गावित (रा. बाबापुर, ता. दिंडोरी) या दोघांना अटक (Bike Theft) करण्यात आले आहे. या दोन्ही संशयितांनी नाशिक शहरातील पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली आणि नाशिक ग्रामीणमधील दिंडोरी व वणी पोलीस ठाणे या हद्दीतील तब्बल १७ मोटरसायकल चोरी केल्या होत्या. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विना नंबर मोटारसायकलवर फिरताना अडकले 

पंचवटी पोलीस ठाण्याचे दोन हवालदार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना मेरी शासकीय ऑफिस गेटसमोर दोन व्यक्ती संशयितरित्या विना नंबर मोटरसायकल घेऊन फिरताना आढळले. पोलिसांनी (Nashik Crime) या दोघांना थांबण्याची विनंती केली असता ते पळून जाऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी शिताफिने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. तसेच मोटारसायकल चोरीच्या सीसीटीव्ही तपासून या दोघांना अटक केली. या कारवाईत एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

SCROLL FOR NEXT