Nashik Aadhartirtha Ashram Saam TV
महाराष्ट्र

Nashik Crime : अल्पवयीन मुलाकडून ४ वर्षीय चिमुकल्याची हत्या; आधारतीर्थ अनाथ आश्रमातील खूनाचा अखेर उलगडा

नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर समोर आली आहे. नाशकात १३ वर्षीय मुलाने ४ वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख, साम टीव्ही

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर समोर आली आहे. नाशकात १३ वर्षीय मुलाने ४ वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या केली आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) येथील त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या आधारतीर्थ आश्रमात एका बालकाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी १३ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Latest Marathi News)

नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जात असताना अंजनेरी गावाजवळ आधारतीर्थ आश्रम आहे. या आश्रमात संपूर्ण राज्यभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं राहतात. दोन दिवसांपूर्वी आश्रमात अलोक शिंगारे या ४ वर्षीय बालकाचा संशयास्पद (Crime News) मृत्यू झाला होता. या मुलाची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना होता.

या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आलोकचा गळा आवळून खून झाल्याचे प्राथमिकदृष्टया निष्पन्न झालं होतं. याप्रकरणी पोलिसांनी (Police) अज्ञाताविरोधात गुन्हा देखील दाखल केला होता. तसेच आश्रमातील मुलांची, पदाधिकारी, कर्मचारी वर्गाची चौकशी करण्यात येत होती.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास करत आश्रमातील १३ वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं आहे. त्याने आलोखची हत्या का केली? याचा अद्यापही उलगडा झालेला नाही. आश्रमातीलच एका १३ वर्षीय मुलाने ४ वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या केल्याचं उघड होताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT