Nashik Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Crime : क्राइम ब्रॉचची सर्वात मोठी कारवाई, कुंटणखाना प्रकरणी राजकीय नेत्याला अटक

Satish Daud

तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक

नाशिकमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कुंटणखाना चालवल्याप्रकरणी एका राजकीय नेत्याला क्राइम ब्रॉचने अटक केली आहे. पवन क्षीरसागरला असं या नेत्याचं नाव असून तो आरपीआय आठवले गटाचा उत्तर महाराष्ट्राचा संघटक असल्याची माहिती आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तपोवन येथील (Nashik News) एका हायप्रोफाइल सोसायटीत कुंटणखाना सुरू असल्याची माहिती क्राइम ब्रांचला मिळाली होती. या कुंटणखाण्यावर राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे, अशा तक्रारी देखील पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. पोलिसांनी तातडीने धाड टाकून काही महिलांची सुटका केली.

तसेच कविता साळवे या कुंटनखाणा (Crime News) चालवणाऱ्या महिलेला अटक केली. तिची कसून चौकशी केली असता. कुंटनखाना चालवण्यात पवन क्षीरसागर या आरपीआय आठवले गटाचा सपोर्ट होता, अशी कबूली तिने दिली. यानंतर क्राइम ब्रांचने तडकाफडकी पवन क्षीरसागरला अटक केली आहे.

दरम्यान, पवन क्षीरसागर यांच्यावर याआधीही अनेकदा गुन्हे दाखल झालेले आहेत. काही वर्षांपूर्वी जुन्या वादातून त्याने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली होती. क्षीरसागर याच्यासह साथीदारांनी अडवून या व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार केले होते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आता थेट कुंटनखाणा चालवण्यात त्याचा सपोर्ट असल्याचे कळताच शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेत नेमकं गणित

SA vs IRE: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! तिसऱ्या वनडेतून स्टार खेळाडू बाहेर

Bigg Boss Marathi 5 च्या ग्रँड फिनालेला आर्याला नो एन्ट्री? काय आहे कारण? वाचा...

Bigg Boss Marathi Grand Finale : ग्रँड फिनालेमध्ये सूरजची झापुक झुपुक स्टाईल, पाहा Photo

SCROLL FOR NEXT