Nashik Citylink bus अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

Nashik शहरातील प्रवास महागणार; सिटीलिंक बस भाड्यात 5 टक्के वाढ

शहर बससेवेच्या भाड्यात 5 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला सादर करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर ही भाडेवाढ केली जाणार आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक - नव्या वर्षात नाशिककरांचा (Nashik) शहरातील प्रवास महागणार आहे. शहरातील महापालिकेच्या सिटीलिंक(Citylink) या शहर बससेवेच्या भाड्यात 5 टक्के वाढ होणार असून यामुळे शहर बससेवेचं (Bus) भाडं 1 ते 3 रुपयांनी महागणार आहे. शहर बससेवेच्या भाड्यात 5 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला (transport authority) सादर करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर ही भाडेवाढ केली जाणार आहे. मागील वर्षी जुलैमध्ये शहरात महापालिकेकडून सिटीलिंक बससेवा सुरू करण्यात आली. (Citylink bus fares increases by 5 percent)

हे देखील पहा -

या बससेवेचा मोठा फायदा नाशिक आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांना होत आहे. मात्र बससेवा (Bus service) सुरू झाल्यानंतर 8 जुलै 2021 ते 31 मार्च 2022 या काळात तब्बल 27 कोटींचा तोटा गृहीत धरण्यात आला आहे. त्यामुळे बससेवेतील तोटा लक्षात घेता हा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढीची शक्कल लढवण्यात आली आहे. मात्र या भाडेवाढीमुळे नाशिककरांच्या खिशाला मात्र अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Weather Update: IMDच्या नव्या अंदाजानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली; महाराष्ट्रात दोन आठवडे पावसाची दांडी

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

SCROLL FOR NEXT