CIDCO Shubham Park Sumit Deore youth murder Saam Tv News
महाराष्ट्र

Nashik Crime : काल कृष्णा आंधळे दिसल्याची चर्चा, आज ऐन सणासुदीच्या दिवशी तरुणाची हत्या; नाशिक हादरलं

Nashik CIDCO Youth Murder : होळीच्या दिवशी नाशकात युवकाची हत्या झालीय. शहरातील सिडको भागातील उत्तम नगर येथील शुभम पार्क, सेट जोसेफ चर्चच्या समोर ही धक्कादायक घडना घडली आहे.

Prashant Patil

नाशिक : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. बीडच्या मस्साजोग येथील दिवंगत सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. त्या हत्येतील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा काल नाशिकमध्ये दिसून आल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे शहरातील पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. त्याचदरम्यान, आज ऐन सणासुदीच्या दिवशी नाशकात एका तरुणाची हत्या झाली आहे. त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

होळीच्या दिवशी नाशकात तरुणाची हत्या झालीय. शहरातील सिडको भागातील उत्तम नगर येथील शुभम पार्क, सेट जोसेफ चर्चच्या समोर ही धक्कादायक घडना घडली आहे. सुमित देवरे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. हत्या करून संशयित आरोपी मात्र घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. सणासुदीच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून घटनास्थळी अंबड पोलीस दाखल झाले आहेत, पुढील तपास ते करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zero Oil Poha Recipe: तेलाचा एकही थेंब न करता बनवा चवदार पोहे, Acidity होणारच नाही

Maharashtra News Live Update: महागाईच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबारमध्ये आंदोलन

आमदार संजय गायकवाड हाजिर हो...; कोर्टाने पोलिसांना दिले निर्देश

Fat Loss: रोज संध्याकाळी करा ही १ सोपी गोष्ट; सुटलेलं पोट कमी होऊन काही दिवसांत मिळेल सडपातळ शरीर

Deool Band 2 Collection : जय जय स्वामी समर्थ! प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' वीकेंडला हाऊसफुल, तिसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT