Crime Saam Tv
महाराष्ट्र

सिद्धार्थनगरात तलवारीने केक कापला; मयूर सोनवणेवर गुन्हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

नाशिक Crime : पंचवटी परिसरातील मखमलाबाद शिवारातील सिद्धार्थनगरला वाढदिवसानिमित्ताने तलवारीने केक कापल्याने एका युवकावर म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या युवकावर रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी यापुर्वी गुन्हा दाखल आहे.

मयूर सोनवणे असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडे तलावर असल्याची माहिती समाज माध्यमातून म्हसरूळ पोलिसांना मिळाली हाेती. त्यावरून म्हसरूळ गुन्हेशोध पथकाने मयूरला ताब्यात घेऊन त्याची चाैकशी केली.

चाैकशीअंती संशयित मयूर सोनवणे याचा मंगळवारी वाढदिवस होता. त्याचे मित्र केक घेऊन आले तेव्हा मयूरने तलवारीने केक कापला व त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती म्हसरूळ पोलिसांनी दिली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात तंत्रज्ञानाची नवी क्रांती! पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये १६ हायटेक प्रयोगशाळा सुरू

White Forest Cake Recipe: घरच्या घरी बनवा बेकरीसारखी चव स्वादिष्ट व्हाईट फॉरेस्ट केक, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून १८० विमान प्रवाशांचे जीव वाचविण्याऱ्या पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांचे कौतुक

Mens Fitness : पुरुषांनो! वयाची ४५ वर्षे पूर्ण केलीत, 'या' ३ गोष्टी करू शकलात तर समजा तुम्ही आहात फिट अँड फाईन

आता प्रधानांच्या प्रधानचा राजीनामा; अभिजीत दीपकेंची मुंबईतून मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT