२ सप्टेंबरच्या व्हायरल फोटोवर रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण
चुकीचे नरेटिव्ह पसरवल्याचा आरोप
अनामिका बोट कापल्याच्या अफवा फेटाळल्या
दोन दिवसापासून चुकीच्या बातम्या चालू आहेत, त्याचा निषेध करते. महिला म्हणून ज्या पद्धतीचं 'सॉफ्ट टार्गेट' केलं गेलं. २ सप्टेंबरचा फोटो दाखवून खोटे नरेटिव्ह सेट करणाऱ्यांच्या विरोधात कायद्याच्या चौकटीतून कारण्यात येईल, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले.
भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलाय. खरातसोबतचे रुपाली चाकणकरांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाकणकर टीकेच्या धनी बनल्या होत्या. विरोधक आणि पक्षातील महिल्या नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेत त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आरोपांना प्रत्युत्तर दिलं.
अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या नाशिकमधील अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकरांचे काही फोटो समोर आले होते. त्यामुळे रुपाली चाकणकरांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. या प्रकरणावरून विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
आपले जे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत, ते पाच वर्षांपूर्वीचे आहेत. एखादा व्यक्ती पुढे जाऊन कसा वागेल याची माहिती आपल्याला कशी असणार. आपलं कुटुंब वारकरी संप्रदायाचं असल्याने अशोक खरातच्या ट्रस्टशी आपण जोडलो गेलो, परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इतर माहिती नव्हती, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
दरम्यान अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. शेकडो महिलांना भूलथापा देत त्यांच्यावर अत्याचार केले असून त्याचे व्हिडिओही काढले असल्याची माहिती समोर आली. या भोंदूबाबाकडे अनेक राजकारणी लोकांची वर्दळ राहायची. त्यातील एक रुपाली चाकणकर होत्या. एका महिलेवर अत्याचार प्रकरणाचा तपास करताना अशोक खरातचे जुने कारनामे समोर आले.
त्याचदरम्यान खरात याचे रुपाली चाकणकरांसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांचे आणखीही फोटो माध्यमांसमोर आले. त्यातून त्यांनी चाकणकरांवर जोरदार टीका केली.
शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील याप्रकरणावरुन चाकणकरांवर अंत्यत गंभीर आरोप केले. चाकणकर यांच्या अटकेची आणि राजीनाम्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली होती. रुपाली चाकणकरांना अटक करुन त्यांची नार्को चाचणी करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. रुपाली चाकणकर या तंत्र-मंत्र विद्या करायच्या. वशीकरणाची विद्या शिकण्यासाठी चाकणकर यांनी २ सप्टेंबर २०२४ रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वत:ची अनामिका कापली होती, असा आरोप अंधारे यांनी केला होता. त्याला रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं.
ज्या गोष्टी दोन दिवस चालू आहेत, त्या चुकीच्या आहेत. आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की आम्ही संस्थानाशी जोडलेलो होतो. पाद्यपूजेचे जे फोटो आहेत ते अनेक वर्षांपूर्वीचे आहेत. अनेक लोकांचे फोटो यामध्ये आहेत, पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं 'सॉफ्ट टार्गेट' केलं गेलं, ते चुकीचं आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये करतायत ते अत्यंत चुकीचं आहे. कोणीतरी २ सप्टेंबरचा फोटो दाखवला, पण तो १२ सप्टेंबरचा आहे.
चाकणकरांनी हाताची अनामिका कापून घेतल्याचा दावा काहीजणांनी केला होता. त्यावरही चाकणकरांनी स्पष्टीकरण दिलं. २ सप्टेंबरचा फोटो दाखवला, पण तो १२ सप्टेंबरचा आहे. २ सप्टेंबरला मी अजितदादांच्या दौऱ्यात होते, माझ्या हाताला कुठेही जखम नव्हती. परंतु सातत्याने खोटी माहिती दिली गेली. ही खोटी माहिती देणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार, असं चाकणकर म्हणाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.