Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Sunita Dhanger Arrested: ८५ लाखांची रक्कम अन् तब्बल ३२ तोळे सोने! शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरात सापडले मोठे घबाड; नाशिकमध्ये खळबळ

एसीबीने सुनीता धनगर यांच्या घरावर धाड टाकली असता मोठे घबाड हाती लागल्याचे समोर आले आहे.

Gangappa Pujari

तबरेज शेख, प्रतिनिधी...

Nashik Bribe News: नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाच घेताना अटक केली होती . तब्बल पन्नास हजारांची लाच स्वीकारताना एसबीकडून (ACB) कारवाई करण्यात आली आहे. सुनीता धनगर यांच्यासह एका मनपा कर्मचाऱ्यास देखील ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आज एसीबीने सुनीता धनगर यांच्या घरावर धाड टाकली असता मोठे घबाड हाती लागल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिता धनगर यांच्या लाचखोरीमुळे महापालिकेच्या शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. लाचखोर शिक्षण अधिकारी सुनिता धनगर यांच्याकडे घराच्या झडतीमध्ये एसीबीला मोठी रोख रक्कम आणि कोट्यवधींची मालमत्ता हाती लागली आहे. एबीसीने आज सुनीता धनगर यांच्या घरची घेतली. ज्यामध्ये त्यांच्या घरात तब्बल ३२ तोळे सोने आणि ८५ लाखांची रोख रक्कम मिळाली आहे.

तसेच सुनिता धनगर यांच्या नावावर दोन फ्लॅट आणि एक प्लॉट असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे. आडगाव येथे प्लॉट असून एक फ्लॅट टिळकवाडी आणि दुसरा फ्लॅट उंटवाडी येथे आहे. राहत्या फ्लॅट 3bhk असून त्याची किंमत दीड कोटीच्या घरात आहे. (Nashik News)

दरम्यान एका खासगी शिक्षण संस्थेच न्यायालयाने संस्थेला शिक्षकाला कामावर रुजू करण्याचे आदेश देऊनही संस्था निलंबन मागे घेत नव्हती. याविषयी दाद मागण्यासाठी संबंधित शिक्षकाने महापालिका प्रशासनाधिकारी सुनिता धनगर यांच्याकडे तक्रार केली. त्यासंदर्भातील आदेश काढण्यासाठी धनगर यांनी ५० हजार आणि त्या कार्यालयातील लिपीक नितीन जोशी याने पाच हजार रुपये शिक्षकाकडे मागितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT