Saptashringi Fort Landslide Saamtv
महाराष्ट्र

Saptashringi Fort Landslide: सप्तशृंगी गडावर मोठी दुर्घटना! दरड कोसळून २ भाविक जखमी

Nashik News: आज मार्कंडेय पर्वतावर सोमवती अमावस्यानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News: काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या (Nashik) सप्तश्रृंगी गडावर (Saptshrungi Fort) बस दरीत कोसळून मोठा अपघात घडला होता. त्यानंतर आज गडावर दरड कोसळल्याची मोठी घटना समोर आली आहे. सप्तश्रृंगी गडासमोरील मार्कंडेय पर्वतावर दरड ही दरड कोसळली असून या दुर्घटनेत दोन भाविक जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज मार्कंडेय पर्वतावर सोमवती अमावस्यानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी ही दरड कोसळल्याची (LandSlide) घटना घडली. यामध्ये दोन भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यातही सप्तशृंगी गडावर दरड कोसळली होती. त्यामुळं सप्तशृंगी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला घाटातील रस्ता दुरुस्तीचे पत्र दिले होते. तसेच रस्त्यावर मार्गदर्शक, साइन बोर्ड, खड्डे बुजवणे, कठडे दुरुस्त करणे, याबाबत तातडीने उपाययोजना आखण्याचे आवाहन करण्यात आलं होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT