Satyajeet Tambe Saam Tv
महाराष्ट्र

Satyajeet Tambe: मोठी बातमी! भाजपने डाव टाकला, नाशिकमध्ये सत्यजित तांबेंना पाठिंबा

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाजप जिल्हाध्यक्षांची ऑनलाईन चर्चा झाली, ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन बनसोडे, शिर्डी

Nashik: माजी काँग्रेस नेते आणि नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना अखेर भाजपा पाठिंबा देणार असल्याचे निश्चित झाले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाजप जिल्हाध्यक्षांची ऑनलाईन चर्चा झाली, यामध्ये हा निर्णय झाला आहे. त्याबद्दल लवकरच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घोषणा करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. (Latest Marathi Update)

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने नाशिकमधून विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती. पण त्यांनी अर्ज न भरता त्यांचे चिरंजीव सत्यजित यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन दोघांनाही पक्षातून निलंबित केले आहे. सत्यजित हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते.

यावर आता अखेरचा निर्णय जाहीर झाला असून चंद्रशेखर बावनकुळेंनीही याबद्दल घोषणा केली आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे..

"नाशिकमध्ये भाजपने कोणताही उमेदवार दिलेला नाही, तसेच अद्याप कोणालाही समर्थनसुद्धा दिलं नाही, त्यामुळं भाजपचे (BJP) मतदार अपक्षा उमेदवाराल मतदान करेल," असे स्पष्टिकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. त्यामुळे आता नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजित तांबे अशी थेट लढत असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro Line 3 : मुंबई मेट्रो ३च्या तिकीटावरून नवा वाद; नावांवर आक्षेप घेत नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

February Grahan 2026: फेब्रुवारीमध्ये १५ दिवसात दोनवेळा लागणार ग्रहण; किती धोकादायक आहे ग्रहण? काय आहेत संकेत

Maharashtra Live News Update: आज अर्ध्या पुणे शहराची बत्ती होणार गुल, वीजपुरवठा राहणार बंद

Ladki Bahin Yojana eKYC: २० लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० कायमचे बंद, ईकेवायसीबाबत महत्त्वाची अपडेट

Mumbai-Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर ३२ तासांनंतर वाहतूक सुरळीत; गॅस टँकर उलटल्याने झाला होता खोळंबा

SCROLL FOR NEXT