Nashik Ashok Kharat Case Update News  Saam Tv
महाराष्ट्र

Ashok Kharat : 'झुंबरची लाइट बंद म्हणजे...'; अत्याचार करण्यासाठी अशोक खरात वापरायचा कोडवर्ड, खळबळजनक माहिती समोर

Nashik Ashok Kharat Case Update News : नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. कोडवर्ड, बंद झुंबर आणि अवतार पूजाच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप.

Alisha Khedekar

  • अशोक खरातवर आतापर्यंत १० एफआयआर दाखल

  • १५० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

  • ‘कोडवर्ड’ आणि झुंबर बंद करून अत्याचार

  • ‘अवतार पूजा’ व तुर्की मधाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. भोंदू खरातच्या पापाचा घडा आता पूर्ण भरला आहे. त्याच्या विरोधात आतापर्यंत एकूण १० गुन्हे एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. अजूनही SIT कडून खरातची चौकशी सुरु आहे. या तपासातून असे समोर आले की, वासनेचा नंगा नाच करताना खरात 'कोडवर्ड' वापरायचा आणि हे कोड वर्ड त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहित होते. धक्कादायक म्हणजे एखाद्या महिलेला शुद्धीकरणासाठी आपल्या केबिनमध्ये बोलावल्यानंतर केबिनमधील झुंबराचा दिवा बंद करायचा.

भोंदू अशोक खरातने आतापर्यंत १५० हुन अधिक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. हे काळे धंदे करताना कोणालाही कळू नये यासाठी त्याने काही कोड वर्डची रचना केली होती. त्याच्या कार्यालयात वेगवेगळ्या कामांसाठी एका विशेष कोड वर्डचा तो वापर करायचा. याबद्दल त्याच्या कर्मचाऱ्यांना देखील माहिती होती.

तसेच खरात त्याच्या केबिनमध्ये महिलांचे लैगिक शोषण करायचा. अत्याचाराआधी तो केबिनच्या बाहेर असलेल्या झुंबराचा दिवा बंद करायचा. या झुंबराचा दिवा बंद असेपर्यंत खरातच्या केबिनमध्ये कोणालाही प्रवेश नसायचा. कार्यालयात काम करणाऱ्यांना या कोडवर्डची माहिती असल्याने ते देखील आत प्रवेश करायचे नाहीत. इतकेच नव्हे, तर व्यवसायातील अडथळे दूर करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करण्यासाठी तो 'अवतार पूजा' या शब्दाचा सांकेतिक भाषेत वापर करायचा अशी माहिती तपासात समोर आली आहे.

तपासात असेही उघड झाले आहे की, आरोपी खरात हा 'तुर्कीमधील गुहेतून आणलेला दुर्मिळ जादुई मध' असल्याचा दावा करून भक्तांना जादुई तुर्की मध विकत होता आणि तो लोकांना प्रति किलोग्राम १५ लाख रुपये विकायचा. दरम्यान, खरात प्रकरणात आता पर्यंत १० गुन्ह्यांची नोंद झाली असून आता या प्रकरणात खरातचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फुटबॉल स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी, वादाला कुठून सुरुवात झाली? बघा VIDEO

भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

Mothers Day: उशीर होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आईला हे ७ प्रश्न नक्की विचारा!

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी पेटवला कांदा

Mothers Day Special : तुमच्याही आईला फिरायला आवडतं? मदर्स डेला 'या' ५ बजेट फ्रेंडली ठिकणी नक्की घेऊन जा

SCROLL FOR NEXT