- विनायक वंजारे
Narak Chaturdashi 2022 : सिंधुदुर्गात (sindhudurg) यंदा दिवाळीचा (diwali) मोठा उत्साह आहे. नरकचतुर्थीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात अनेक ठिकाणी हौसी मंडळातर्फे नरकासूर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज पहाटेच्या सुमारास नरकासुराचे (Narkasur) दहन करुन काेकणवासीयांनी दिवाळी साजरी करण्यास प्रारंभ केला आहे. (Sindhudurg Latest Marathi News)
नरकचतुर्थीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात अनेक ठिकाणी हौसी मंडळातर्फे नरकासूर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गेले दोन वर्ष कोरोनामुळे या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. यंदा मात्र मोठ्या उत्साहात अनेक मंडळानी नरकासुर बनवून स्पर्धेत उतरवले होते.
कणकवली (kankavali), कुडाळ (kudal), मालवण (malvan), सावंतवाडी (sawantwadi) व इतर ठिकाणी मोठ मोठे अक्राळविक्राळ नरकासुर सर्वाचे लक्षवेधून घेत होते. भर बाजारपेठेतून वाजतगाजत या नरकासुरांची मिरवणुक काढण्यात आली. (Maharashtra News)
श्रीकृष्णाने आजच्या दिवशी नरकासुर राक्षसाचा वध करून आसुरी शक्तीचा नाश केला होता त्याचे प्रतीक म्हणून नरकासूर दहनाची मोठी प्रथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळते. नरकचतुर्थीच्या पूर्वसंध्येला आणलेले नरकासुरांचे भल्या पहाटे दहन करण्यात आले. नरकासुर दहन पहाण्यासाठी लोकांची मोठ्या संख्येने गर्दी हाेती. (Breaking Marathi News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.