narayan rane & uddhav thackeray 
महाराष्ट्र

म्हाडाच्या परीक्षेवरुन राणेंचे ठाकरेंकडे बाेट; नेतृत्वहीन राज्य

खरंतर सरकार अस्तित्वात आहे का असा प्रश्न पडला आहे.

विजय पाटील

कोल्हापूर (Mhada exam postponed) : राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर काय हाेत आहे हे तुम्ही सर्वजण पाहताच आहात. खरंतर महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात आहे का हाच मुळात प्रश्न उपस्थित हाेत आहे. गत दाेन वर्षांत महाराष्ट्रास दहा वर्ष मागे नेण्याचे काम महाविकास आघाडी (mahavikas aaghadi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केले आहे अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी काेल्हापूरात (kolhapur) केली.

म्हाडाची परीक्षा (Mhada exam postponed) अचानक रद्द झाल्याने राज्यभरात महाविकास आघाडीच्या सरकार विराेधात विद्यार्थी, राजकीय नेते नाराजी व्यक्त करु लागले आहेत. काेल्हापूरात एका कार्यक्रमासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी देखील महाविकास सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टिकेची झाेड उठवली.

राणे म्हणाले महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्र दहा वर्ष मागे पडले आहे. मुख्यमंत्री कधी घराच्या बाहेरच पडत नाही. राज्याचे नेतृत्वच अकार्यक्षम असल्याने मंत्रीमंडळ तरी कसे चालणार. खरंतर सरकार अस्तित्वात आहे का असा प्रश्न पडला आहे.

भाजपमध्ये कोण मोठे अन् कोण छोटे याचं मूल्यमापन मी करणार नाही परंतु संजय राऊत यांनी आग लावण्याचे धंदे बंद करावेत. पक्षाला गळती लागली आहे, त्याकडे अधिक लक्ष द्या असे खासदार संजय राऊत यांच्या विधानावर केंद्रीय मंत्री राणे यांनी प्रत्युत्तर दिले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025 Astrology: नोकरीत बढती अन् आर्थिक चणचण होणार दूर; या ४ राशींचे व्यक्ती मालामाल

Nandurbar : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक; अधिकारी हप्ते घेत असल्याचा आरोप, परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक

Rangoli Tips: दारासमोर काढलेली रांगोळी फेकून देऊ नका, असा करा वापर, भांडी होतील झटक्यात चकाचक

Maharashtra Live News Update : निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढणार - बाळा नांदगावकर

Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

SCROLL FOR NEXT