आता जपून पावलं टाकायची : नारायण राणे Saam Tv
महाराष्ट्र

आता जपून पावलं टाकायची : नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित करून कालच्या घडल्या सर्व प्रकारावर सविस्तर प्रतिक्रया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित करून कालच्या घडल्या सर्व प्रकारावर सविस्तर प्रतिक्रया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे.

हे देखील पहा -

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, "मी असं काय बोललो की इतका राग आला. जर त्यांची काही चुक दाखवली तर काय इतका राग का आला. मी अशी काय चूक केली. ज्याला आपल्या देशाचा अभिमान असतो त्याला या गोष्टी माहिती असतात. पण त्यांना माहिती नव्हते म्हणून मी बोललो. शिवसेना नेत्यानीही अशी वक्तव्ये केली. बीडीडी चाळ भुमिपुजानाच्या वेळी काहीतरी वक्तव्य केलं. हा योगी आहे की ढोंगी, याला चपलाने मारला पाहिजे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचा उल्लेख त्यांनी केला असून, योगी हे देखील उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या बाबतीत असं बोलणं उद्धव ठाकरेंना शोभत का? असा सवाल आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

दरम्यान, आता पुढच्या वेळेस बोलताना रेकॉर्डिंग करून ठेवेल आणि त्याचे कॅसेट जवळ ठेवेल. आता पासून जपून पावलं टाकली पाहिजेत, असे देखील नारायण राणे म्हणाले. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री होण्याची संधी दिली . प्रथमतःच मी केंद्रीय मंत्री बनल्यामुळे मला मोदींनी लोकांत फिरून जनाशीर्वाद घेण्यास सांगितले. मात्र, यावेळी बोलताना माझ्या काही वक्तव्यांचा विपर्यास केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : मोठी बातमी! पुढील ३ दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Pune Fort : सह्याद्रीतील दगडात कोरलेला अद्भुत किल्ला, पुण्यातील ‘हे’ ठिकाण जपतेय इतिहासाचा वारसा

Cocktail 2 Collection : 'कॉकटेल २' फ्लॉप की हिट? रश्मिका-शाहिद-कृतीच्या 'लव्ह ट्रँगल'नं दोन दिवसांत किती कोटींचा गल्ला जमावला?

ऑपरेशन टायर हाणून पाडण्यासाठी ठाकरेंचा शेवटचा डाव, २ आमदार अचानक ओमराजेंच्या घरी दाखल; मध्यरात्री काय घडलं?

Coffee Tips : कॉफी पिण्याची योग्य वेळ काय? तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT