मार्च महिन्यात मविआ सरकार कोसळणार, भाजप सत्तेत येणार : राणेंचा दावा (पहा Video) Saam Tv
महाराष्ट्र

मार्च महिन्यात मविआ सरकार कोसळणार, भाजप सत्तेत येणार : राणेंचा दावा (पहा Video)

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: महाराष्ट्रातील (Maharashtra) महाविकास आघाडीचं Mahavikas Aghadi Government सरकार लवकरचं पडणार आहे. हे सरकार जास्त काळ टिकणारं नाही, असे विरोधी पक्षातील नेते वारंवार बोलत असतात. त्यातच आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले आहेत की, महाराष्ट्रातील मविआ सरकार मार्च महिन्यात कोसळणार आहे असा खळबजनक दावा नारायण राणेंनी केला आहे.

मार्च महिन्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार अशी राजकीय भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे आज हे शुक्रवारी जयपूर दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी ही भविष्यवाणी केली आहे.

व्हिडीओ-

यावेळी नेमकं काय म्हणाले नारायण राणे?

नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही, त्यामुळे तिथे तसे होत आहे. लवकरच महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल येत्या मार्च महिन्यात भाजपचे सरकार येईल आणि तुम्हाला सर्वांना अपेक्षित असा बदल दिसून येणार.

यावेळी, नारायण राणे पुढे म्हणाले काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. गोष्टी जाहीरपणे गेल्या तर एखादा महिना सरकार आणखी राहिल. मग भाजपचे सरकार येण्याची तारीख पुढे जाईल.

अनिल परब यांची राणे यांच्या भविष्यवाणीवर प्रतिक्रिया;

नारायण राणे यांनी सरकारविषयक केलेल्या भविष्यवाणीवर, परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, राणे काय म्हणतात यावर सरकार चालत नाही. सरकार संख्या बळावर चालते आणि आघाडी सरकारकडे पूर्ण संख्याबळ आहे. हे सरकार 5 वर्षे पूर्ण करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT