Narayan Rane Vs Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Narayan Rane Vs Sanjay Raut : संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलीय; राणेंनी स्वीकारलं चॅलेंज

माझं संरक्षण सोडून मी संजय राऊतां समोर जाणार, असं म्हणत राणेंनी राऊतांच चॅलेंज स्वीकारलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Narayan Rane Vs Sanjay Raut : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातला वाद पुन्हा एकदा वाढला आहे. संजय राऊत यांनी काल नारायण राणे यांच्यावर निशाणा साधत मैदानात येण्याचे खुले आव्हान केले. यावर आता राणेंनी राऊतांना खरमरीत प्रत्युत्तर देत हे चॅलेंज स्वीकारलं आहे. मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली ती संजय राऊतांनी घेतली आहे. माझं संरक्षण सोडून मी संजय राऊतांसमोर जाणार, असं म्हणत राणेंनी राऊतांच चॅलेंज स्वीकारलं आहे. (Latest Narayan Rane Vs Sanjay Raut News)

राज्याच्या राजकारणात शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले आहेत. आमदारांसह आता काही नगसेवक देखील शिंदे गटात सहभागी होताना दिसत आहेत. अशात शिवसेना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली असल्याचा मोठा आरोप राणेंनी राऊतांवर केला आहे.

राऊतांनी केलेल्या खुल्या आव्हानाविषयी पत्रकारांशी संवाद साधताना राणे म्हणाले की, "मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली ती घेतली आहे संजय राऊतांनी. राऊतांना आनंद आहे की, त्यांनी शिवसेना संपवली. त्यांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक असे कोणतेच काम केले नाही."

" आज नाही तर १९९० सालापासून मला संरक्षण आहे. त्यावेळी राऊत शिवसेनेत नव्हते. ते लोकप्रभेत लेख लिहित होते. मी आज ही सर्व सुरक्षा सोडून जायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस शिंदे चांगले काम करत आहेत. सकाळी उठले की तुम्ही संजय राऊत दाखवता. पत्रकार म्हणून चांगल्या गोष्टी दाखवा.", असंही राणे म्हणाले.

" राऊतांचे काय योगदान आहे. आजच्या राजकारणातले ते जोकर आहेत. शिव्या घालण्यापलीकडे काही करत नाहीत. काशीला आणि सारनाथला आमचा राम घेवून चालला आहे. तिथे रामाचे कार्य चालू असताना रावणाचा उल्लेख कशाला? मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे की, मी खासदार झाल्यावर संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याविषयी जे बोलायचे ते मी त्यांना सांगणार आहे. ते ऐकूण दोघांनी राऊतांना चपलेने मारलं नाय तर मला विचारा. मी आज ना उद्या माझं सर्व संरक्षण सोडणार आणि संजय राऊतांना भेटायला जाणार, " असं नारायण राणे यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT