narayan rane assures barsu refinery project in konkan  saam tv
महाराष्ट्र

Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा राजकारण पेटणार? नारायण राणेंच्या भूमिकेकडे काेकणवासियांचे लक्ष

या प्रकल्पाची भूमिका जनतेसमोर मांडली जाईल अशी ग्वाही मंत्री नाराण राणे यांनी दिली.

अमोल कलये

Ratnagiri News :

रिफायनरी प्रकल्प समर्थक शिष्टमंडळाने नुकतीच केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (narayan rane) यांची दिल्ली येथे भेट घेत बारसू रिफायनरी प्रकल्प (barsu refinery project latest marathi news) काेकणातच (konkan) हवा असा पुन्हा एकदा आग्रह धरला आहे. या शिष्टमंडळास नारायण राणेंनी सकारात्मकता दाखवत लवकरच केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त बैठक घेतली जाईल असे आश्वासित केले आहे. दरम्यान आगामी काळात बारसू रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा राजकारण पेटणार की शमणार अशी चर्चा काेकणात सुरु झाली आहे. (Maharashtra News)

बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन दाेन गट निर्माण झाले आहेत. एक रिफायनरी समर्थक. दुसरा रिफायनरी विराेधक. गेली अडीच वर्षे विराेधी गट बारसूला आंदोलनाच्या माध्यमातून प्रखर विराेध करीत आहे. यामुळे कोकण भागातील राजकारण तापत असते.

रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी मंत्री नारायण राणे यांची दिल्लीत भेट घेत हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा अशी मागणी केली. त्यावर राणे यांनी निश्चित प्रकल्प लवकर मार्गी लागेल असे शिष्टमंडळास आश्वासित केले. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी (hardeep singh puri) यांची भेट घेवून त्यावर चर्चा करणार असल्याचे राणे यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजापूर येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्रीय भूमिका स्पष्ट करून ती भूमिका जानेवारीत उद्योग मंत्रालय केंद्र सरकार आणि उद्योग मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांची संयुक्त बैठक राजापुरात घेण्याचे आश्वासनही राणेंनी दिले. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोबत राजापूरात सभा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT