Narayan Rane, Vinayak Raut saam tv
महाराष्ट्र

Kokan News : दिवाळीनंतरही काेकणात फुटताहेत राजकीय फटाके; 'डीपीसी' त राणे-राऊतांत खडाजंगी (पाहा व्हिडिओ)

जिल्हा नियाेजन बैठक सिंधुदूर्गात सुरु आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Kokan News : दिवाळीनंतरही काेकणात राजकीय फटाके फुटत असल्याचे आज (शुक्रवार) जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीत दिसून आले. आजच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे बैठकीत काही काळ गाेंधळ निर्माण झाला. (Sindhudurg Latest Marathi News)

आज (शुक्रवार) सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यात जिल्हा नियोजनची बैठक सुरू आहे. आमदार रवींद्र चव्हाण हे पालकमंत्री झाल्यानंतर व शिंदे गटाच्या निर्मितीनंतरची ही पहिलीच जिल्हा नियोजनची बैठक होत आहे. या बैठकीस जिल्ह्यातील सर्वच मातब्बर नेते उपस्थित राहणार हाेते. त्यामुळे ही बैठक कशी हाेणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात हाेती. (Maharashtra News)

ही बैठकी सुरु झाली. या बैठकीत काही विषयांवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे या बैठकीत काही काळ गाेंधळ निर्माण झाला. विनायक राऊत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना विचारलेल्या एका प्रश्नावर नारायण राणे (narayan rane) यांनी आक्षेप घेतल्यानंतर विनायक राऊत भडकले.

यावेळी खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी नेमकं मिटिंग कोण चालवतय ? असा सवाल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केला. त्यानंतरही खासदार राणे बाेलत राहिले त्यामुळे गाेंधळात भर पडली. ही बैठक अद्यापही सुरु आहे. या बैठकीस शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित आहेत. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT