sambhaji bhide uddhav thackeray narasayya adam 
महाराष्ट्र

ठाकरे- भिडे भेट : 'बंद खोलीत कोणी कुणाचे पाय धरले'; आडमांचा प्रहार

विश्वभूषण लिमये

सोलापूर : पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे sambhaji bhide यांची भेट झाली होती. या भेटी दरम्यान संभाजी भिडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंद खोलीत चर्चा केली. या भेटीबाबत सोलापूर येथील माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम narasayya adam यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेंना भेटणे हे लोकशाहीला, पुरोगामी चळवळीला हरताळ फासणारी गोष्ट आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात पुणे पोलिसांनी 16 ते 17 विचारवंतांना अटक केली आहे. त्यांना तुरुंगात डांबले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील सर्व विचारवंतांना सोडवणे गरजेचे आहे. याउलट ते भीमा कोरेगाव दंगल घडवून आणणाऱ्या संभाजी भिडेंना भेटतात आणि बंद खोलीत चर्चा करतात हे किती संयुक्तिक आहे असा प्रश्न नरसय्या आडम यांनी केला आहे.

84 वर्षीय स्टीफन यांना प्लास्टिकचा ग्लास उचलता येत नाही, अशा व्यक्तीला भीमा कोरेगाव प्रकरणात अटक केली जाते आणि तुरुंगातच त्यांना मारले जाते. हा प्रकार संभाजी भिडेंमुळे घडला आहे असा आराेप आडम यांनी केला. संभाजी भिडेंना भेटणे योग्य नसल्याचे आडम यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.

ते म्हणाले संभाजी भिडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोघे बंद खोलीत चर्चा करून बाहेर आले. या बंद खोलीत कोण कुणाचे पाय धरले, हे माहिती होणे गरजेचे आहे. विद्याविरोधी किंवा अंधश्रद्धेचा कायदा मोडणारे म्हणून संभाजी भिडेंची ओळख आहे अशी टीका करत आडम यांनी भेटीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजेंडा राबविणार नाहीत आणि महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या कौलाशी प्रतारणा करणार नाहीत अशी अपेक्षा माकपने व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुझा संतोष देशमुख करून टाकू...'; बीडमध्ये गावगुंडांकडून किर्तनकार महाराजाला अमानुष मारहाण, Video Viral

Shocking: गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करत तरुणाची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर; नागपूर हादरले

Weight Loss : हाय प्रोटीन चटपटीत अन् कुरकुरीत भजी, जे खाऊन झपाट्याने कमी होईल लठ्ठपणा

Hawa Mahal: हवा महल बांधण्यासाठी किती खर्च आला होता?

Fort In Raigad : स्वराज्याच्या सागरी संरक्षणाची शान! समुद्रात कमळासारखा उभा असलेला 'हा' किल्ला तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT