राम रघुवंशी 
महाराष्ट्र

Nandurbar : भाजपचे दावे खुप पण पुर्ण होत नाही : राम रघुवंशी

भाजपचे दावे खुप पण पुर्ण होत नाही : राम रघुवंशी

दिनू गावित

नंदुरबार : जिल्‍हा परिषदेत सत्‍तांतर होणार असा दावा भाजपकडून केला जातो. परंतु, ते शक्‍य होणार नाही. भाजपकडून खुप दावे केले जातात. मात्र ते पुर्ण होत नाही. जिल्‍हा परिषदेवर सत्‍ता पुर्वीप्रमाणेच राहिल. यामुळे भाजपचा दावा खोटा ठरणार असे मत कोपर्डी गटातून शिवसेनेचे विजयी उमेदवार राम चंद्रकांत रघुवंशी बोलताना मांडले. (nandurbar-zp-election-news-shiv-sena-ram-raghuvanshi-victory-koprdi-gut)

नंदुरबार जिल्‍हा परिषदेच्‍या पोट निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. यात पहिल्‍या टप्‍प्‍यात कोपर्डी गटातून विजयी झाल्‍यानंतर शिवसेनेचे राम रघुवंशी यांनी प्रतिक्रीया दिली. रघुवंशी यांनी सांगितले, की पोटनिवडणुक लागल्‍यानंतर भाजपकडून सत्‍तांतराचा दावा केला गेला. परंतु, तसे होवू शकणार नाही. कारण भाजपच्‍या सात उमेदवारांना पोटनिवडणुक लढवावी लागत आहे. यात दोन जणांचा पराभव झाला असून, निकालानंतर सर्व चित्र स्‍पष्‍ट होईल.

शिवसेनेच्‍या पदरात आणखी पद

जिल्‍हा परिषदेत पोट निवडणुकीच्‍या निकालानंतर सत्‍तेचे समीकरण पुर्वीप्रमाणेच राहील. शिवसेनेकडे उपाध्‍यक्ष पद कायम राहणार असून, उलट आणखी एक सभापती पद शिवसेनेच्‍या पदरात पडणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

कामाची पावती

विजयानंतर रघुवंशी यांनी कोपर्डी गटातील नागरीकांचे आभार मानत नागरीकांनी पुन्‍हा विश्‍वास दाखविला आहे. गेल्‍या दीड वर्षात जे काही कामे गटात केली असतील. त्‍याची पावती नागरीकांनी दिली असून, पुढील साडेतीन वर्षात देखील शिवसैनिक म्‍हणून सेवा करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवारांसोबतची आजची भेट राजकीय भेट नव्हती - दिलीप वळसे पाटील

Mumbai : मुंबई हादरली! मध्यरात्री रिसॉर्टमध्ये गोळीबार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Skin Care: तुमच्या चेहऱ्यासाठी कोणता फेसवॉश बेस्ट? स्किन टाइपनुसार करा योग्य निवड

Reheated rice: कालचा भात गरम करून खाण्यापूर्वी हे नक्की वाचा; एका चुकीमुळे होईल फूड पॉइझनिंग!

Kuchu Puchu Meaning : कुचू-पुचू म्हणजे नेमकं काय? व्हायरल होणाऱ्या Gen Z स्लँग्सचा मजेशीर अर्थ जाणून घ्या

SCROLL FOR NEXT