Nandurbar Z.P School Saam TV
महाराष्ट्र

मोठी बातमी! नंदुरबारमध्ये जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली; विद्यार्थी बचावले

सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने मोठी दुर्घटना टळली.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच धडगाव तालुक्यातील मांडवी खुर्द गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या (School) इमारतीच्या पुढचा भाग कोसळला आहे. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने मोठी दुर्घटना टळली. (Nandurbar Latest News)

नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम विभागातील रस्ते, शाळा, अंगणवाड्या कोणतेही काम निकृष्ट दर्जाचे केले जात असून, काही वर्षातच नांदुरुस्त होऊन खराब होत असल्याचे चित्र आहे. याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. मांडवी खुर्द गावात पहिले ते सातवी विद्यार्थ्यांना नांदुरुस्त अवस्थेत असलेल्या इमारतींमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे.

गावात आणखी दोन शाळेच्या इमारती असून त्याही जीर्ण अवस्थेत असल्याने, पाणी पावसाच्या दिवसात पडून दुर्घटना होण्याची भीती येथील पालकांनी व्यक्त केली आहे. सदर इमारत शाळा सुरू असताना पडली असती तर मोठी दुर्घटना झाली असती.

दोन इमारतींच्या खोल्यांमध्ये बसून शिक्षण घेणे धोक्याचे असल्याने विद्यार्थी शाळेच्या ओट्यावर बसून शिक्षण घेत असल्याचे चित्र आहे. संबंधित विभागाने तत्काळ लक्ष देऊन इमारतींची दुरुस्ती करावी व येथील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी विनंती प्रशासनाकडे गावकऱ्यांनी केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT