Nandurbar ZP Saam TV
महाराष्ट्र

नंदुरबार, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत अधिकारी व सदस्यांमध्ये खडाजंगी

तक्रार करुनही लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता या निकृष्ठ कामांना पाठीशी घालत असल्याचा आरोप...

दिनू गावित

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज थेट जिल्हा परिषद सदस्य आणि अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दीक खडाजंगी पहावयास मिळाली. तक्रार करुनही लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता या निकृष्ठ कामांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत भाजपाच्या महिला सदस्यांनी त्याचे फोटो सभागृहात सादर करत यावर कारवाईची मागणी केली.

मात्र सदस्य हे अशोभनिय पद्धतीने बोलत असल्याचा आरोप करत आपण थेट या प्रकरणी मुख्यमंत्री यांच्याकडे सदस्या विरोधात तक्रार करणार असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितल्या नंतर सभागृहात चांगला गोंधल पहावयास मिळाला.

सदस्य आणि अधिकारी यांच्यात थेट झालेल्या या शाब्दिक युद्दाने सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले होते. अध्यक्षांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला असला तरी आजच्या सभेत तब्बल तीन वेळा सदस्यांनी अधिकाऱयांना चोप देण्याची भाषा केल्याने नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये सदस्य विरुद्ध अधिकारी असाच सामाना रंगणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT