Nandurbar Zp Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar ZP: अध्यक्षपदासाठी होणार निवडणूक; पुन्‍हा कॉंग्रेस– सेना की भाजप– सेना

अध्यक्षपदासाठी होणार निवडणूक; पुन्‍हा कॉंग्रेस– सेना की भाजप– सेना

Rajesh Sonwane, दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा कार्यकाळ १७ ऑक्टोबरला संपुष्टात येत आहे. यामुळे याच दिवशी अध्यक्षपदासाठी निवडणूक (Nandurbar ZP) होण्याची शक्यता असून यास जिल्हा प्रशासन व जि.प.प्रशासनाने दुजोरा दिला आहे. यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. आता अध्यक्षपदी नेमके कोण विराजमान होणार? विद्यमान अध्यक्षांना पुन्हा संधी मिळणार की राजकीय समीकरणे बदलणार याकडे लक्ष लागून आहे. (Nandurbar Zilha Parishad News)

नंदुरबार (Nandurbar) जिल्हा परिषदेचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ जुलैला संपुष्टात आला होता. परंतु याच कालावधीत राज्यात सत्तासंघर्ष सुरू असल्याने (Zilha Parishad) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षणाकडे फारसे गांभीर्याने घेण्यात आले नाही. दरम्यान, सत्ता संघर्षानंतर नवीन शिंदे- फडणवीस सरकारने अध्यक्षपदाला तीन महिन्यांची मुदत वाढ दिली होती. सत्ताधाऱ्यांसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत जणू हा बोनस काळ मिळाला होता. दरम्यान १ ऑक्टोबरला नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले आहे. आता १७ ऑक्टोबरला जि.प.अध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यातच अध्यक्ष पदासाठीची निवडणूक १७ ऑक्टोबरलाच होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

भाजपही लावणार जोर

सद्यस्थितीमध्ये जिल्हा परिषदेवर कॉँग्रेस व शिवसेनेची सत्ता आहे. अध्यक्षपदी कॉँग्रेसच्या ॲड. सीमा वळवी तर उपाध्यक्षपदी ॲड. राम रघुवंशी आहेत. जि.प. निवडणूकीनंतर कॉँग्रेस व शिवसेनेने युती करत भाजपला सत्तेपासून रोखले होते. तर आता सत्ता स्थापनेसाठी भाजप देखील हालचाली करणार असल्याची शक्यता आहे. यामुळे आता राजकीय समीकरणांमध्ये नेमका काय बदल होतो? हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जि.प.मध्ये सत्तांतर होणार की पुन्हा पुढील अडीच वर्षांसाठी विद्यमान अध्यक्षांना संधी मिळणार? नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT