Nandurbar  
महाराष्ट्र

Nandurbar : मानसिक आजाराने त्रस्त, महिलेनं २ चिमुकल्यासह आयुष्य संपवलं, नंदुरबार हादरलं!

Nandurbar News : मानसिक आजाराने त्रस्त झालेल्या महिलेने आपल्या 2 चिमुकल्यासह आयुष्य संपवले. या घटनेमुळे नंदूरबारमध्ये खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

सागर निकवाडे, नंदुरबार

Latest Nandurbar News in Marathi : नंदुरबारमध्ये अतिशय दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. मानसिक आजाराने त्रस्त झालेल्या महिलेने आपल्या 2 चिमुकल्यासह आयुष्य संपवले. अक्कलकुवा तालुक्यातील कूवा या आदिवासी पाड्यावर ही धक्कादायक घटना घडली आहे. जेसमबाई वसावे असं मृत आदिवासी महिलेच नाव आहे.

अक्कलकुवा येथील मोलगी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. जेसमबाई वसावे या मानसिक आजाराने त्रस्त होत्या. त्यांनी दोन्ही मुलांना गळफास देत, स्वत:ही गळफास घेत आयुष्य संपवलं, असे पोलिसांना प्राथमिक तपासातून समोर आलेय. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कुवा या आदिवासी पाड्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे.

मानसिक आजाराच्या त्रासाने कंटाळून एका आदिवासी महिलेने आपल्या दोन लहान चिमुकल्यांसोबत घळफास घेतल्याची घटना घडली आहे. जेसाबाई सुभाष वसावे वय 35 वर्ष महिलेचा नाव आहे. दिव्या सुभाष वसावे (वय 4 वर्ष) आणि नरेश सुभाष वसावे (वय 15 वर्षीय) या दोन लहान मुलांना गळफास लावून स्वतः महिलेने राहत्या आयुष्य संपवले.

जेसमाबाई सुभाष वसावे या मनसिक आजारामुळे त्रस्त होत्या. त्यामुळे आजाराला वैतागून दोन्ही मुले दिव्या व नरेश यांना गळफास देऊन व स्वतः गळफास घेतली. तिघांचाही मृत्यू झाला. पती सुभाष वसावे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोलगी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आदिवासी भागात देखील वाढत्या आत्महत्येच्या घटना आता चिंतेच्या विषय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई, पुणे अन् हैदराबादचा प्रवास होणार फक्त दीड तासांत; बुलेट ट्रेननं नाशिकच्या वाइन, कृषी उद्योगाला मिळेल चालना

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट

Deool Band 2 Collection : स्वामींची भक्ती अपरंपार! वीकेंडला 'देऊळ बंद 2' हाऊसफुल, बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंचा डंका; छप्परफाड कमाईचा आकडा किती?

PM Kisan Yojana: मे महिना संपला तरी 23 वा हप्ता नाही; शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 कधी येणार? तारीख कधी येणार समोर?

Solapur : क्रिकेटच्या मैदानात भयंकर घडलं, रोलर ओढत असताना १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT