महिला व बालकल्याण विभागाच्या प्रधान सचिव व आयुक्त यांचा नंदुरबार जिल्हा दौरा SaamTvNews
महाराष्ट्र

महिला व बालकल्याण विभागाच्या प्रधान सचिव व आयुक्त यांचा नंदुरबार जिल्हा दौरा

शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्याचे महिला बाल विकास विभागाचे काम - आय.ए. कुंदन (प्रधान सचिव)

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : राज्यात कुपोषणामुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात राज्याचे महिला बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव आय. ए. कुंदन (I A Kundan) व आयुक्त रूबल अग्रवाल (Rubal Agrawal) यांनी नंदुरबार जिल्ह्यातील महिला बाल विकास विभागाच्या वतीने सुरू असलेल्या कामाची पाहणी करत शासनाने राबवलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात का याबद्दल माहिती जाणून घेत लाभार्थ्यांची थेट चर्चा करत योजनांबद्दल माहिती जाणून घेतली. सकाळच्या सत्रामध्ये नंदुरबार तालुक्यातील बालआमराई काळंबा येथील अंगणवाडींना भेट देऊन कामाची पाहणी केली.

हे देखील पहा :

काळंबा येथील अंगणवाडीत लाभार्थी मुलांना पोषण आहार खाऊ घातला. तसेच शासनाकडून आलेल्या अंगणवाडी साहित्याची पाहणी केली. यानंतर नंदुरबार एकात्मिक आदिवासी प्रकल्पाअंतर्गत आश्रमशाळांना जेवण पुरवठा करणाऱ्या मध्यवर्ती किचन शेडची पाहणी केली. दुपारच्या सत्रात प्रधान सचिव यांच्या टीम नाही दुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणी दाखल असलेल्या कुपोषित बालकांची पाहणी केली.

शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पोषण पुरवठ्याचा योग्य आहार लाभार्थ्यांना दिला जातो का याबाबत त्यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना विचारणा केली. येथील समस्या जाणून घेतल्या तसेच या परिसरात काम करणाऱ्या महिला बालविकास कर्मचाऱ्यांशी संवाद साधून जिल्ह्यात कुपोषित बालकांचा वाढणारा आकडा बाबत चिंता व्यक्त करत राज्यात नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणाची स्थिती बाबत गांभीर्याने काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळेस कर्मचाऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.

मुलगी पोषण पुनर्वसन केंद्रातून लाभ घेऊन कुपोषणमुक्त झालेल्या मुलांचा व दुर्गम भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रधान सचिव आय.ए. कुंदन आणि आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर मोलगी येथील महिला बचत गटाद्वारे बगर प्रक्रिया उद्योगाला भेट देऊन महिला सक्षमीकरनाच्या योजनांचा आढावा घेतला.‌

एकूणच राज्य महिला बालविकास व महिला सक्षमीकरण बाबत शासनाकडून राबविला जाणाऱ्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत मिळत असल्याबाबत प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी समाधान व्यक्त केलं. तसेच पाहणी दौऱ्यादरम्यान आढळलेल्या त्रुटींबाबत शासन स्तरावर उपाययोजना करून समस्या सोडविल्या जातील अशी प्रतिक्रिया महिला बाल विकास प्रधान सचिव आहे आय.ए.कुंदन यांनी दिली. यावेळी मंत्रालयातील महिला बाल विकास विभागातील अधिकारी व जिल्ह्यातील महिला बालविकास अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT