nandurbar, grampanchayat election result 2022,
nandurbar, grampanchayat election result 2022,  saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निकालात भाजपची सरशी; राष्ट्रवादीनं खातं खाेललं

दिनू गावित

Grampanchayat Election Result 2022 : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील दोनशे ग्रामपंचायतींसाठी नुकतेच मतदान झाले. आज प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. सध्या तीन ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. तिन्ही ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता आलेली आहे. (Nandurbar Latest Marathi News)

कोरोना काळात कार्यकाळ संपलेल्या दुसऱ्या टप्प्यातील 206 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून रविवारी त्यासाठी मतदान झाले. आज मतमोजणीस प्रारंभ झाला. अक्कलकुवा, तळोदा, नवापूर आणि धडगाव अशा चार तालुक्यांपैकी 206 ग्रामपंचायतची निवडणूकीमध्ये याआधीच सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर 183 सदस्य आणि ८ सरपंच बिनविरोध झाले आहे. उर्वरित 200 ग्रामपंचायत मधील 1321 सरपंच उमेदवार व चार हजार पेक्षा अधिक सदस्य पदाच्या उमेदवारांचे निकाल आज जाहीर होणार आहे. (Taloda Grampanchayat Election Result)

नवापूर तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी १५ टेबल ६ फेरीमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. त्यासाठी ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आपल्या गावातील गाव कारभारी कोण निवडून येतो हे बघण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये ही मोठा उत्साह दिसून येत आहे. मतमोजणीच्या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे. (Maharashtra News)

आत्तापर्यंत हाती आलेले निकाल

तळोदा तालुक्यातील आमलाड ग्रामपंचायतीवर भाजपाने ताबा मिळवला आहे.

तळोदा तालुक्यातील प्रतापपुर ग्रामपंचायतवर भाजपाचा विजय.

तळोदा तालुक्यातील बोरद ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली.

नंदुरबार अपडेट

हाती आलेले ग्रामंपचायत निकाल - 04

भाजपा - 03 विजयी

कॉग्रेस - ००

राष्ट्रवादी - 01

बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट )- 00

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना - 00

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेला, १२० फुटावरून उडी मारली अन् डोहात बुडाला; तरुणाचा भयानक मृत्यू

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT