Shahada Crime Saam tv
महाराष्ट्र

Shahada Crime : मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेले अडीच लाख केले लंपास

Nandurbar News : स्टेट बँक शहादा येथून अडीच लाख रुपयांची रक्कम काढली. त्यांनी हि रोकड मोटारसायकलच्या डिक्कीत कापडी पिशवीश ठेवेळी. यानंतर ते दुपारी पावणेदोनला ग्रामपंचयातीच्या कामानिमित्त शहादा पंचायत समिती कार्यालयात आले.

Rajesh Sonwane

शहादा (नंदुरबार) : शहादा पंचायत समिती कार्यालय परिसरात केंद्रीय राज्य राखीव दलातील निवृत्त कर्मचाऱ्याच्या (Nandurbar) मोटारसायकलच्या डिकीतून अडीच लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना (CCTV) सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, चोरट्यांनी तोंडाला कपडा  बांधल्याने ते त्यांची ओळख पटू शकलेली नाही. (Live Marathi News)

निवृत्त केंद्रीय राज्य राखीव दलाचे जवान किशोर आत्माराम पाटील (रा. फेस, ता. शहादा) यांनी ८ फेब्रुवारीला स्टेट बँक शहादा (Shahada) येथून अडीच लाख रुपयांची रक्कम काढली. त्यांनी हि रोकड मोटारसायकलच्या डिक्कीत कापडी पिशवीत ठेवली. यानंतर ते दुपारी पावणेदोनला ग्रामपंचयातीच्या कामानिमित्त शहादा पंचायत समिती कार्यालयात आले. यावेळी मोटारसायकल पंचायत समितीच्या आवारात लावून ते बांधकाम विभागाच्या दालनात गेले. मात्र किशोर पाटील पुन्हा मोटारसायकल उभी (Crime News) असलेल्या ठिकाणी आले तेव्हा त्यांना त्यांची डिक्की उघडी दिसली. यात पहिले असता त्यातील रक्कम त्यात दिसून आली नाही. त्यानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार संजय ठाकूर तपास करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


सीसीटीव्हीत कैद
दरम्यान, पंचायत समिती कार्यालयात जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काळ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी रक्कम लंपास केल्याचे स्पष्ट झाले. त्याआधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT