Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : दुर्दैवी.. शेळीला वाचवण्याच्या प्रयत्नात जीव गमावला; मेंढपाळाचा नदीत बुडून मृत्यू

Nandurbar News : दुपारच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गेला होता. कान्हेरी नदी काठालगत शेळी चारत असताना शेळी पाणी पिण्यास नदीत उतरली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नदी काठावर शेळ्या चारण्यासाठी गेला असताना नदीत गेलेल्या शेळीला वाचविण्यासाठी मेंढपाळ नदीत उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शहादा तालुक्यातील अवघे गावालगत घडली. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील अवघे गावातील मेंढपाळ भावड्या भिल असे घटनेत मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. भावड्या भिल हा १४ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गेला होता. कान्हेरी नदी काठालगत शेळी चारत असताना शेळी पाणी पिण्यास नदीत उतरली. यावेळी पाण्यात डुबकी खात खाली गेल्याचे मेंढपाळच्या लक्षात आले. यानंतर शेळीला बाहेर काढण्यासाठी भावड्या भिल हा नदीत गेला असताना त्याला पाण्याच्या पातळीचा अंदाज आला नसल्याने नदीत पडल्याने मृत्यू झाला. 

माती काढल्याने नदीत खोल खड्डा

दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजेपासून (Prakasha) प्रकाशा येथील पट्टीचे पोहणारे यूवक ट्युब नदीत टाकत यूवकांचे शोध घेतला. चार तासांचा प्रयत्नानंतर यूवकांचा मृतदेह सापडला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहिती वरुन पावसाळ्यापूर्वी रस्ता भराव कामाकरीता जेसीबी लावून नदीतील पिवळी मातीचा उपसा करण्यात आला होता. सुमारे पाचशे मीटर लांबीचा पंचवीस तीस फुट खोल खड्डा झाल्याने नदीला यावर्षी पुर आल्याने मेंढपाळ या नदीचे खोलीकरण अंदाज आला नसल्याने मृत्यू झाल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Care : आयब्रोचे केस कमी झालेत? जाड आयब्रोसाठी फॉलो करा ही सोपी केअर रुटीन

Maharashtra News Live Update: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची निवड

कोडिंगच्या जोरावर PMPMLचं बनावट ॲप! फुकट प्रवासासाठी 20 वर्षीय विद्यार्थ्याचा प्रताप उघड

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT