Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: २० हजारांची लाच घेताना अभियंत्याला अटक; लघुपाटबंधारेतील बिलासाठी घेतली रक्कम

Shahada News : २० हजारांची लाच घेताना अभियंत्याला अटक; लघुपाटबंधारेतील बिलासाठी घेतली रक्कम

साम टिव्ही ब्युरो

शहादा (नंदुरबार) : लघुपाटबंधारे विभागात केलेल्या तीन कामांची बिले काढण्यासाठी २० हजारांची (Bribe) लाच मागितली. यातील १९ हजार ५०० रुपये स्वीकारताना शहादा (Shahada) पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता तथा उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याचा पदभार असलेल्या दिनेश केशवराव पाटील यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. (Live Marathi News)

तक्रारदारांनी २०२२ मध्ये जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत शहादा तालुक्यात एकूण तीन कामे पूर्ण केली आहेत. तिन्ही कामांची बिले काढून दिल्याच्या मोबदल्यात कनिष्ठ अभियंता दिनेश पाटील याने तक्रारदार यांच्याकडून एकूण ९५ हजार रुपयांची मागणी केली होती. यापैकी वेळोवेळी ७५ हजार रुपये एवढी रक्कम तक्रारदाराकडून याआधीच घेतली आहे. उर्वरित २० हजार रुपयांसाठी पाटील याने (Nandurbar) तक्रारदाराकडे तगादा लावला होता. पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीदरम्यान तडजोडीअंती १९ हजार ५०० रुपये एवढी रक्कम त्याने स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. 

रक्कम घेताना रंगेहाथ पकडले 

पाटीलला जिल्हा परिषदेच्या नंदुरबार येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ तक्रारदाराकडून १९ हजार ५०० रुपये एवढी रक्कम (ACB) स्वीकारताना अटक करण्यात आली. त्याला ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचा तडाखा

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

SCROLL FOR NEXT