Shahada Crime Saam tv
महाराष्ट्र

Shahada Crime : लग्न समारंभातून ७ लाखांचे दागिने चोरी; मध्य प्रदेशच्या सासी गँगमधील तिघेजण ताब्यात

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात काही दिवसांपूर्वी बालाजी मंगल कार्यालयात २२ नोव्हेंबरला विवाह समारंभ पार पडला. या विवाह समारंभातून सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरट्यानी गर्दीचा फायदा घेत लांबविली होती.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरामधील बालाजी मंगल कार्यालयात झालेल्या लग्न सोहळ्यातून दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती. यात सुमारे ७ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेले होते. पोलिसांनी या चोरीचा तपास लावला असून मध्य प्रदेशातील टोळीतील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. 

जिल्ह्यातील शहादा शहरात काही दिवसांपूर्वी बालाजी मंगल कार्यालयात २२ नोव्हेंबरला विवाह समारंभ पार पडला. या विवाह समारंभातून सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरट्यानी गर्दीचा फायदा घेत लांबविली होती. चोरट्यांनी लांबविलेल्या या पर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम, मोबाईल असा ९ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. यामुळे विवाह सोहळ्यात प्रचंड गोंधळ उडाला होता. 

दरम्यान याबाबत शहादा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी तपास करण्यासाठी एक पथक नेमले. यानंतर शहादा पोलिसांनी तपासाला सुरवात केली. या चोरीमध्ये मध्य प्रदेशातील गँगचा समावेश असल्याचे लक्षात आले.

यानंतर पोलिसांनी मध्यप्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील सासी गँगचा शोध घेत जवळपास दहा दिवसांहून अधिक काळ वेषांतर करून मध्यप्रदेश मध्ये घालवले. दरम्यान लंपास करण्यात आलेल्या सोन्याचा छडा लावण्यात शहादा पोलीसांना यश आले आहे. या गुन्हा प्रकरणी मध्यप्रदेशमधील कुख्यात सासी गॅगच्या तीन सदस्यांचा शहादा पोलिसांनी मागोवा घेत होती.

मात्र हे तीन सदस्य पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरत होते. अखेर मध्य प्रदेशमध्ये सात दिवसाचा मुक्काम ठोकल्यानंतर सासी टोळीतील एका सदस्याच्या सावत्र आई ममताबाई पर्वत सिसोदिया (वय ५० वर्षे) हिच्या कडून ७ लाख २० हजार किंमतीचे १८ तोळे सोने हस्तगत करण्यात आला आहे. तर अन्य दोघांना देखील ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT