Shahada Crime Saam tv
महाराष्ट्र

Shahada Crime : दुकानासमोरून जात असल्याच्या शुल्लक कारणातून खून; शहादा तालुक्यातील घटना, दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल

Nandurbar News : दुकानासमोरून दयाराम साठे ये जा करीत असतं. याचा राग येऊन ९ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास यशवंत मोरे याने दयाराम साठे यांना अडवत आमच्या दुकानात समोरून का जातो? तुला दुसरा रस्ता नाही का

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : गावात असलेल्या दुकानासमोरून नागरिक ये जा करत होते. त्याचा राग आल्याने तू आमच्या दुकानात समोरून का जातो दुसरा रस्ता नाही का? असे सांगत दोघा भावांनी एकाचा बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना शहादा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहादा (Shahada) तालुक्यातील खेडदिगर या गावात हि धक्कादायक घटना घडली आहे. गावातील हनुमान मंदिराजवळ यशवंत मोरे यांचे दुकान आहे. त्या दुकानासमोरून दयाराम साठे ये जा करीत असतं. याचा राग येऊन ९ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास यशवंत मोरे याने दयाराम साठे यांना अडवत आमच्या दुकानात समोरून का जातो? तुला दुसरा रस्ता नाही का? असे म्हणत शिवीगाळ केली. यादरम्यान यशवंत मोरे याचा भाऊ अनिल मोरे याने दयाराम साठे यांना लाकडी दांड्याने डोक्यावर तसेच पाठीवर मारहाण केली. (Crime News) तसेच यशवंतने देखील लाथा बुक्क्यांनी पोटावर मारहाण केली. 

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 

दोघं भावांनी केलेल्या मारहाणीत दयाराम शिवलाल साठे (वय ५२) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरती जितेंद्र रामोळे याच्या फिर्यादीवरून अनिल हिरामण मोरे व यशवंत हिरामण मोरे याच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT