Nandurbar Zp 
महाराष्ट्र

Nandurbar zp : जिल्हा परिषदेत सत्‍ता कायम; पंचायत समितीत सत्‍तांतर

शहादा आणि नंदुरबार पंचायत समितीमध्ये सत्तांतर झाले आहे. या दोन्ही पंचायत समिती भाजपच्या ताब्यात होत्या. शहादा पंचायत समिती काँग्रेसने वर्चस्व मिळवले आहे

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यातील पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेत काँग्रेस– शिवसेना आघाडीने सत्ता कायम राखली. तर शहादा, नंदुरबार पंचायत समितीमध्ये सत्तांतर झाले आहे. (nandurbar-news-zp-election-shiv-sena-congress-Continuity-in-Zilla-Parishad)

ओबीसी आरक्षणामुळे रद्द झालेल्या रिक्त पदांसाठी जिल्हा परिषदेचे ११ गट व पंचायत समितीच्या १४ गणांमध्ये निवडणूक पार पडली. जिल्हा परिषदेत काँग्रेस– शिवसेना आघाडीने सत्ता कायम राखली आहे. तर शहादा आणि नंदुरबार पंचायत समितीमध्ये सत्तांतर झाले आहे. या दोन्ही पंचायत समिती भाजपच्या ताब्यात होत्या. शहादा पंचायत समिती काँग्रेसने वर्चस्व मिळवले आहे. तर नंदुरबार पंचायत समितीत शिवसेनेने वर्चस्व मिळवले आहे.

२०१९ च्‍या निवडणुकीतही वर्चस्‍व

नंदुरबार जिल्हा परिषदेत एकूण ५६ सदस्यत्व असून २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे २३, शिवसेनेचे ७, भाजपचे २३, राष्ट्रवादीचे ३ असे संख्याबळ होते. सत्तास्थापनेसाठी २८ सदस्यांची गरज असताना शिवसेना- काँग्रेसने आघाडी करुन ३० संख्याबळावर सत्ता स्थापन केली होती. यामध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपाध्यक्ष पद माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी यांच्याकडे होते. परंतु त्यांचे पद रद्द झाल्यामुळे त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले होते.

भाजपचे संख्‍याबळ झाले कमी

पोटनिवडणुकीतील अकरा गटांपैकी काँग्रेसने ३, भाजपने ४, शिवसेनेने ३ आणि राष्ट्रवादीने १ जागेवर विजय मिळवला असून जिल्हा परिषदेतील ५६ जागांपैकी पक्षीय बलाबल आकडेवारी कांग्रेस २४, शिवसेना ८, भाजप २०, राष्ट्रवादी ४ असे संख्याबळ झाले आहे. यात काँग्रेस आणि शिवसेनेच्या एकूण ३१ सदस्यांचे संख्याबळ करून सत्ता कायम ठेवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT