Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

नंदुरबारला पाणी टंचाई; आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा

नंदुरबारला पाणी टंचाई; आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा

दिनू गावित

नंदुरबार : पावसाळा सुरू होवून अद्याप चांगला पाउस झालेला नाही. यामुळे पाणी टंचाईचा प्रश्‍न उद्‌भवला आहे. परिणामी नंदुरबार (Nandurbar) शहरामध्‍ये आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. याची सुरवात २८ जूनपासून होणार आहे. (nandurbar news Water scarcity Water supply for two days)

नंदुरबार परिसरात अजूनपर्यंत पाऊस (Rain) पडलेला नाही. पेरण्या सुध्दा झालेल्या नाहीत. अशा बिकट परिस्थितीज पाणी किती दिवस पुरेल याची खात्री नाही. मध्यंतरी विद्युत विभागाच्या अडचणीमुळे दोन दिवस पाणी पुरवठा अनियमित झाला होता. आज ही पिवळसर पाणी शहरामध्ये धरणातील मृत साठ्यामधील असल्याने येत आहे व नगरपरिषदेच्यावतीने पाणी उकळून प्यावे असे आवाहन सुध्दा आम्ही केलेले आहे.

पाणीसाठी वाढेपर्यत दोन दिवसाआड पाणी

नंदुरबार नगरपरिषदेने पुढील सर्व परिस्थितीचा विचार करुन 28 जूनपासुन दोन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन केले आहे. जोपर्यंत धरणातील पाणीसाठा वाढत नाही; तोपर्यंत दोन दिवसाआड नंदुरबार शहराला पाणी पुरवठा आम्ही करु. जनतेने पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT