Shahada Prakasha News Saam tv
महाराष्ट्र

Shahada News: प्रकाशा येथे पाणी प्रश्न पेटला; बीडीओ विरोधात नागरीकांचा मोर्चा

प्रकाशा येथे पाणी प्रश्न पेटला; बीडीओ विरोधात नागरीकांचा मोर्चा

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : उन्‍हाळ्यात बहुतांश गावांमध्‍ये पाणी टंचाईच्‍या झळा सहन कराव्‍या लागत असतात. यात आता पावसाळा लांबल्‍याने टंचाईच्‍या झळा अधिक गळद झाल्‍या आहेत. आदिवासी जिल्‍हा असलेल्‍या (Nandurbar) नंदुरबारमध्‍ये अनेक गावांमध्‍ये पाणी प्रश्‍न निर्माण झाला आहे. यात तापी नदीच्‍या काठावर असलेल्‍या (Prakasha) प्रकाशा येथे देखील पाणी समस्‍या उद्‌भवली आहे. (Maharashtra News)

शहादा तालुक्यातील प्रकाशा हे तापी नदीच्या काठावर (Tapi River) वसलेले गाव. शिवाय येथे धरण असल्‍याने पाणी प्रश्‍न उद्‌भवणे कठीण आहे. तरी देखील गावात काही भागात गेल्‍या काही दिवसांपासून पाणी मिळत नाही. गावातील काही भागात पाणीपुरवठा होत नसल्याने गावातील पाणी प्रश्न पेटला असून गावातील गढी व कुंभार खाच या परिसरामध्ये ग्रामस्थांना पाणी येत नसल्याने ग्रामपंचायतमध्ये महिला व पुरुषांनी मोर्चा काढला.

बीडीओंची अरेरावी

पाणी येत नाही म्हणून ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांनी (Shahada) शहादा बीडीओ यांना फोन केला. मात्र त्यांनी समाधानकारक उत्तर न देता अरेरावी केली. म्हणून तेथील नागरिकांनी त्यांचा विरोधात आणि पाणी मिळत नाही म्हणून मोर्चा काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत दाखल

Health Tips : जेवणासोबत कच्चा कांदा आणि लसूण खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

पुण्यातील विद्यानंद बापटनंतर आता 'एनर्जीमॅन' कामत काकांची चर्चा, गणेशोत्सव, डीजेवर नॉनस्टॉप बोलले!

Coffee Intake: कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही? मग जाणून घ्या दिवसाला किती कप कॉफी प्यावी

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

SCROLL FOR NEXT