Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: अपघातात दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त ट्रॅक्‍टर रस्त्यावर उभे झाला दुसरा अपघात

अपघातात दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त ट्रॅक्‍टर रस्त्यावर उभे झाला दुसरा अपघात

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार– खांडबारा रस्त्यावर बिजादेवी येथील हॉटेलजवळ ट्रॅक्टर आणि मोटरसायकलीचा अपघात झाला. यात एका युवकाचा रुग्णालयात (Hospital) उपचारादरम्‍यान मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेमध्ये आपघातग्रस्त ट्रॅक्टर तसेच उभे असल्याने त्याचा अंदाज न आल्याने मोटर सायकलस्वार त्यावर आदळून झालेल्या दुसऱ्या आपघतातही (Accident) एकाचा मृत्यू झाला आहे. एकाच जागेवर दोन वेळा झालेल्या अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. (Nandurbar Accident News)

नंदुरबार– खांडबारा (Nandurbar) रस्त्यावर बिजादेवी येथे ट्रॅक्‍टर व मोटारसायकलीचा अपघात झाला. या अपघातात (Accident News) जखमी झालेल्या दिलीप सुदाम देसाई (वय 39) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे त्याला 108 रुग्णवाहिकेने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

अन्‌ ट्रॅक्‍टरवर दुचाकी धडकली

दुसरीकडे अपघातग्रस्त ट्रॅक्टर बाजूला करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र मोठा तांत्रिक बिघाड आणि भरलेले ट्रॅक्टर असल्याने त्याला रोडावरून बाजूला करताना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे उभ्‍या ट्रॅक्‍टरवर दुचाकी येवून धडकली. यात दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार, मोदींच्या हस्ते उद्घाटन; कुठून-कुठे असणार प्रवास

Maharashtra News Live Update: माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाले

Palghar Fort : शौर्य अन् इतिहासाचा अनमोल वारसा, पालघरमध्ये वसलाय 'हा' भव्य किल्ला

Sleeping Problems: रोज ६ तासांपेक्षा कमी झोपता? शरीरावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Chanakya Niti : ऑफिसमध्ये जळणारे सहकारीही करतील कौतुक! चाणक्यांच्या या ७ नीती ठरतील यशाची गुरुकिल्ली

SCROLL FOR NEXT