Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: भीषण अपघात टळला; चरणमाळ घाटात तीव्र उतारावरून ट्रकचा अपघात

भीषण अपघात टळला; चरणमाळ घाटात तीव्र उतारावरून ट्रकचा अपघात

Rajesh Sonwane

नंदुरबार : महाराष्ट्र गुजरात राज्याची सीमेलगत धुळे– नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीतील नवापूर (Navapur) तालुक्यातील चरणमाळ घाटात अपघातांची (Accident News) मालिका सुरूच आहे. तीव्र उतराच्या घाट रस्त्यातून तांदळांनी भरलेला ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. (Live Marathi News)

तीव्र उतारावरून खाली येत असताना ट्रक थेट कठडे तोडून दरीत जाता जाता वाचला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे. स्थानिक बोरझोर व चरणमाळ येथील नागरिकांनी चालकाला 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी नवापूर पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहे.

गुजरातकडे जात होता ट्रक

अपघातग्रस्त ट्रक आंध्र प्रदेशमधून गुजरात (Gujrat) राज्यात तांदूळ घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. एकूणच तीव्र उताराचा व वळणाच्या चरणमाळ घाट रस्त्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कठडे दुरुस्तीसाठी केलेली पाहणी केवळ पाहणी राहिली आहे. अद्यापही या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुरुस्ती झाली नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT