Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: सरकारच्या निर्णया विरोधात आदिवासी समुदाय एकवटला; धनगर समाजाला आदिवासीसींचे आरक्षण देण्याला विरोध

Nandurbar News : सरकारच्या निर्णया विरोधात आदिवासी समुदाय एकवटला; धनगर समाजाला आदिवासीसींचे आरक्षण देण्याला विरोध

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: राज्यात सुरू असलेल्या धनगर आरक्षणाच्या मागणीला राज्य सरकार सकारात्मक असल्याचे (Nandurbar) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आदिवासी (Aadivasi) समाज एकवटला असून जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन करत निषेध केला जात आहे. (Breaking Marathi News)

धनगर समाजाला (Dhangar Reservation) आदिवासी समाजाच्या आरक्षणात समाविष्ट करण्याचा राज्य शासनाचा डाव असल्याचा आरोप करत नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना आणि आदिवासी समुदायाच्यावतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. आदिवासी समुदायाच्यावतीने तीन टप्प्यात आंदोलन करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात बेमुदत धरणे. त्यानंतर मोर्चाच्या माध्यमातून आवाज सरकारपर्यंत पोहोचवला जाणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर विधानभवनावर पायी मोर्चा 

मात्र सरकारने भूमिका कायम ठेवल्यास नंदुरबार जिल्ह्यातून आणि राज्याच्या सर्वच भागातून आदिवासी बांधव पायी मोर्चा काढत मुंबईतील विधानभवनाला वेढा घालतील; असा इशारा आदिवासी समुदायाच्या वतीने विविध संघटनांच्या प्रमुखांनी दिला आहे. धनगर आरक्षणाचा मुद्द्यासोबतच त्यांच्या इतर प्रलंबित मागण्यासाठीही या सोबतच आंदोलन करण्यात येणार असून तालुकास्तरावरही विविध संघटना प्रशासकीय कार्यालयाचा बाहेर धरणे देतील, अशी माहिती अजय गावित यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT