Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: वाघाची कातडी व नखांची तस्‍करी; शहाद्यात टोळी गजाआड

वाघाची कातडी व नखांची तस्‍करी; शहाद्यात टोळी गजाआड

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यात वनविभागाने (Forest Department) मोठी कारवाई केली आहे. यात वाघाची कातडी (Shahada) आणि नखांची अवैध तस्करी करत असलेल्‍याच्‍या आरोपावरून चार जणांना अटक केली आहे. (Maharashtra News)

अटक केलेल्या आरोपींच्या दाव्यानुसार गुजरात राज्यातून वाघाची कातडी आणि नखांची तस्करी केली गेली होती. यानंतर शहाद्यात एका ग्राहकाला याची विक्री केली जाणार होती. वन विभागाला तीन जण शहाद्यात वाघाची कातडीसह नखे अवैधरित्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती होती. त्‍यानुसार वन विभागाने पोलिसांच्‍या मदतीने सापळा रचला होता.

कातडी व २० नखे जप्‍त

वन विभागाने सापळा रचून या तीन जणांना अटक केली. त्याचबरोबर ग्राहकाला देखील ताब्यात घेतल्यावर त्यांच्याजवळ असलेल्या वाघाची कातडी, २० नग नखे मिळून आली. आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT