Toranmal News Saam tv
महाराष्ट्र

Toranmal News : थंड हवेचे ठिकाण तोरणमाळला जाण्यासाठीचा रस्ता बनला धोकादायक; पर्यटकांचा जीव धोक्यात घालून प्रवास

Nandurbar News : पावसाळ्यात या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खचला होता. मात्र पावसाळा संपल्यानंतर देखील रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे संबंधित बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून तोरणमाळची ओळख आहे. याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र याठिकाणी पोहोचण्यासाठी पर्यटकांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे. कारण पावसाळ्यात येथील घाट रस्त्याची खराबी झाली असताना अद्याप त्याची दुरुस्ती झालेली नाही. परिणामी तोरणमाळकडे जाणारा रस्ता धोकादायक बनला आहे.   

तोरणमाळ (Toranmal) येथे गुलाबी थंडीच्या आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. मात्र गेल्या पावसाळ्यात या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खचला होता. मात्र पावसाळा संपल्यानंतर देखील रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे संबंधित बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. या (Nandurbar) ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती चार महिन्यापासून करण्यात आल्याने पर्यटकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.  

रस्ता दुरुस्तीची मागणी 

इतकेच नाही तर या परिसरातील हजारो नागरिकही या धोकादायक रस्त्यांवरून प्रवास करत आहे. रस्त्याच्या बाजूने खचलेला भाग आता रस्त्यापर्यंत खचत असल्याने हे रस्ते अजून धोकादायक झाले आहेत. गेल्या चार महिन्यापासून रस्ता दुरुस्ती होत नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी पुढे आली आहे.

मोठ्या अपघाताची शक्यता 
खचलेल्या रस्त्याजवळ आणि भगदाड पडलेल्या भागाजवळ फलक आणि सुरक्षा उपाययोजना करणे जरुरीचे असले; तरी सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. परिणामी या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. येणाऱ्या काळात प्रशासन या गोष्टीकडे किती गांभीर्याने लक्ष देऊन काम करत हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT