Railway Crime Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime : रेल्वेत चाकूचा धाक दाखवत करायचे चोरी; लोहमार्ग पोलीसांनी 48 तासात आवळल्या मुसक्या

पाच जणांनी रेल्वे प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत प्रवाशांकडून रोख रक्कम १७ हजार व आधार कार्ड, पॅन कार्ड हिसकावून घेतले आणि ते फरार झाले होते.

Ruchika Jadhav

सागर निकवाडे

Nandurbar Crime News: रेल्वे प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत लुटमार करण्याऱ्या टोळीतील तीन जणांना नंदुरबार लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांची लूटमार होत असते. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे ८ तारखेला घडली. (Latest Nandurbar Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पाच जणांनी रेल्वे प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत प्रवाशांकडून रोख रक्कम १७ हजार व आधार कार्ड, पॅन कार्ड हिसकावून घेतले आणि ते फरार झाले होते. त्यानंतर नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाण्यात याबाबत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशानुसार लोहमार्ग पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते.

लोहमार्ग पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेत टोळीतील तिघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या ताब्यातून १७ हजाराची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पुढील दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांनी दिली.

नंदुरबारमध्ये चोरीच्या घटनांचे प्रामाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. काही दिवसांपूर्वी येथे प्रेट्रोल चोरट्यांचा सुळसूळाट सुटला होता. देशभरात पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या अनेक घटना परिसरात घडत आहेत. अशीच एक पेट्रोल चोरीची घटना विसरवाडी सारख्या ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयाजवळ शिवमंदिर परिसरात रात्री २ वाजेच्या सुमारास घडली. घरासमोर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत पेट्रोल चोरीची घटना कैद झाली.

या ठिकाणी पेट्रोल चोरीसाठी हा चोरटा गेला आणि घरासमोर उभी मोटारसायकलीतून खाली बसून पेट्रोल चोरी करतानाचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर त्यावेळी जोरदार व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSC Exam : बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा मिशनचा फज्जा, दहावीचा पेपर ३ दिवस आधीच फोडला

LPG Crisis: जनता 'गॅस'वर, हॉटेल चुलीवर, हॉटेलला आता लाकडं, कोळशाचा आधार

Thursday Horoscope : मानसिक तणाव जाणवेल; ५ राशींच्या लोकांना वाणीवर संयम ठेवावा लागेल, अन्यथा...

Maharashtra Live News Update : पुढील दोन दिवस उन्हाचा कडका, तापमान 40 पार जाण्याची शक्यता

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

SCROLL FOR NEXT