अस्तंबा शिखर 
महाराष्ट्र

अस्तंबा शिखरावर पहिल्यांदा फडकला तिरंगा

अस्तंबा शिखरावर पहिल्यांदा फडकला तिरंगा

दिनू गावित

नंदुरबार : सातपुडा पर्वतातील सर्वात उंच अस्तंबा शिखरावर पहिल्यांदा तिरंगा ध्वज फडकला. त्याचे कारण ही तसेच आहे. आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे हे दोन महिन्यानंतर द. अमेरिकामध्ये असलेले सर्वात उंच शिखर माउंट अकांगुआ सर करण्यासाठी मोहिमेवर जाणार आहेत. त्याआधी त्यांनी अस्तंबा ऋषीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. त्या ठिकाणी त्यांनी तिरंगा ध्वज फडकवला. (nandurbar-news-The-Indian-flag-was-hoisted-for-the-first-time-on-the-Astamba-mount)

सातपुडा पर्वत रांगेतील अक्कलकुवा तालूक्यातील 'बालाघाट' या अतिशय दुर्गम लहान खेड्यातील आदिवासी समाजातील पहिला नवयुवक अनिल वसावे यांने कोरोना काळानंतर युरोपातील सर्वोच्च शिखर 'माऊंट एलब्रूस' सर करून विश्वविक्रम केला होता. कोरोना काळात जगात सुरू झालेल्या पर्वत आरोहण मोहिमेतील अनिल वसावे भारतातून गेलेल्या गिर्यारोहकांमधून पहिला आदिवासी समाजाचा प्रतिनिधी ठरला होता.

सातही सर्वोच्‍च शिखर सर करण्याचा मानस

अनिल वसावे यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले, की हे ध्येय त्याने अत्यंत कठीण परिस्थितीत गाठले असून आजवर त्याने २०२१ मध्ये केलेली ही दुसरी आंतरराष्ट्रीय मोहीम आहे. २६ जानेवारी २०२१ रोजी ही अनिल वसावे याने आफ्रिका खंडातील माऊंट किलीमांजारो हे शिखर सर केले होते. ८ जुलै २०२१ मध्ये एकाच वर्षी २ आंतरराष्ट्रीय मोहिमा अंमलात आणताना युरोपातील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या टीमचे नेतृत्व ही करायला मिळाले. ही कामगिरी करताना अनिल वसावे याला एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले असून येणाऱ्या काळात सातही खंडातील ७ सर्वोच्च शिखरे सर करण्याचा त्यांचा मानस आहे.

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे हे दोन महिन्यानंतर दक्षिण अमेरिकामध्ये असलेले सर्वात उंच शिखर माउंट अकांगुआ सर करण्यासाठी मोहिमेवर जाणार आहेत. त्याआधी त्यांनी सातपुडा पर्वतातील सर्वात उंच अस्तंबा शिखर सर करत अस्तंबा ऋषीचे दर्शन घेत आशिर्वाद घेतला. त्यानंतर तेथे तिरंगा ध्वज पडकवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FASTag पासच्या नावाखाली होतेय फसवणूक, एका चुकीमुळे होईल अकाउंट रिकामं; NHAI ने केलं अलर्ट

Maharashtra News Live Update: अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी

Face Fat Yoga: हनुवटी आणि गळ्यावरची चरबी ७ दिवसात करा कमी रोज फक्त १० मिनिट करा 'हा' फेस योगा

Heart Attack Women: सावधान! हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभरआधी महिलांमध्ये दिसतात ही सामान्य लक्षणं, दुर्लक्ष करणं ठरेल घातक

Crime: सोबत बसून दारू प्यायले, नंतर नवऱ्याने बायकोला संपवलं; शिर धडावेगळं करून गावभर फिरवलं, थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT